
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे खूप घाम येतो आणि त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन होतं. यामुळे चक्कर येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. शरीरात पाणी आणि आवश्यक मिनरल्सची कमतरता झाल्यास अशक्तपणा येतो आणि डोकं गरगरायला लागतं. पण काळजी करू नका, काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही या त्रासापासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात व्हर्टिगो किंवा चक्कर येण्यावर काय उपाय करायचे.
उन्हाळ्यात तुमच्या बॅगमध्ये ओआरएस (ORS) चं पॅकेट नक्की ठेवा. दिवसातून एक ते दोन वेळा ओआरएसचं पाणी प्या. जर तुमच्याकडे ओआरएस नसेल, तर लिंबू पाणी किंवा मीठ-साखरेचं पाणी प्यायल्यानेही फायदा होतो. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन टिकून राहतं आणि चक्कर येत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स करण्यासाठी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. यामुळे अशक्तपणा लगेच दूर होतो. रोज एक ते दोन ग्लास नारळ पाणी पिणं शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
आलं फक्त थंडीतच नाही, तर उन्हाळ्यातही शरीरासाठी फायदेशीर ठरतं. आल्यामुळे रक्ताभिसरण (blood circulation) सुधारतं, ज्यामुळे चक्कर येण्याची समस्या कमी होते. तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता किंवा आल्याचा एक छोटा तुकडा चघळू शकता.
जर तुम्हाला उन्हाळ्यात अचानक चक्कर आली, तर लगेच खाली बसा किंवा झोपून घ्या. शक्य असल्यास थंड हवेच्या ठिकाणी बसा आणि दीर्घ श्वास घ्या. असं केल्याने चक्कर येण्यापासून लगेच आराम मिळतो.
उन्हाळ्यात चक्कर येण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही तुळशीचं सेवन करू शकता. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच तुळशीची पानं चघळल्यास चक्कर येण्याची समस्या दूर होते.
उन्हाळ्यात नेहमी हलकं आणि पौष्टिक जेवण करा. तुमच्या आहारात फळं, सॅलड आणि दह्याचा समावेश नक्की करा. टरबूज, काकडी आणि संत्री यांसारखी पाणीदार फळं शरीराला थंडावा देतात आणि डिहायड्रेशनपासून वाचवतात.