Fridge Organization: अस्ताव्यस्त फ्रिजला करा 'टाटा-बायबाय'! या ५ सोप्या टिप्सने पसारा होईल कमी

Published : May 05, 2026, 07:33 PM IST
Messy fridge organization tips

सार

तुमचा फ्रिज नेहमीच अस्ताव्यस्त असतो का? पसारा कमी करण्यासाठी आणि फ्रिज व्यवस्थित ठेवण्यासाठी या ५ सोप्या टिप्स वापरा. योग्य नियोजन, एअरटाईट डबे आणि नियमित सफाईमुळे तुमचा फ्रिज स्वच्छ आणि उपयोगी राहील.

आपल्या किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फ्रिज. पण हाच फ्रिज जर पसारा आणि वस्तूंनी भरलेला असेल, तर ऐनवेळी वस्तू शोधणं खूप अवघड होऊन बसतं. अनेकदा तर यात ठेवलेलं अन्न खराब होतं ते वेगळंच. थोडंसं नियोजन आणि योग्य स्टोरेजच्या मदतीने तुम्ही तुमचा फ्रिज केवळ स्वच्छच नाही, तर जास्त उपयोगीही बनवू शकता. जर तुमचा फ्रिजसुद्धा नेहमी भरलेला आणि अस्ताव्यस्त राहत असेल, तर या सोप्या टिप्स तुमच्या नक्कीच कामी येतील.

फ्रिजमध्ये वेगवेगळे सेक्शन करा

फ्रिज व्यवस्थित ठेवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यात वेगवेगळ्या वस्तूंचे गट करून सेक्शन तयार करणे. उदाहरणार्थ, दुधाचे पदार्थ (डेअरी प्रोडक्ट्स) एका जागी, भाज्या वेगळ्या आणि उरलेलं अन्न वेगळ्या कप्प्यात ठेवा. यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट पटकन मिळेल आणि गरज नसताना नवीन वस्तू विकत घेणंही टाळता येईल.

एअरटाईट डब्यांचा वापर करा

फ्रिजमध्ये उघडी भांडी ठेवल्यास ती जास्त जागा घेतात आणि पसाराही होतो. त्याऐवजी एअरटाईट डब्यांमध्ये अन्न ठेवल्यास जागा तर वाचतेच, शिवाय अन्न ताजंही राहतं. शक्यतो पारदर्शक डबे वापरा, जेणेकरून आत काय ठेवलं आहे हे सहज दिसेल आणि दुसरी भांडी इकडे-तिकडे करण्याची गरज पडणार नाही.

 

डब्यांवर लेबल लावा

जर तुम्ही फ्रिजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवत असाल, तर डब्यांवर लेबल लावण्याची सवय खूप महत्त्वाची आहे. यामुळे कोणती वस्तू कधी ठेवली आहे आणि ती कधीपर्यंत वापरायची आहे, हे तुमच्या लक्षात राहील. विशेषतः उरलेलं अन्न वेळेवर वापरण्यासाठी ही पद्धत खूप उपयोगी ठरते.

FIFO नियम वापरा (First In, First Out)

फ्रिजमधील पसारा टाळण्यासाठी FIFO नियम खूप प्रभावी आहे. याचा अर्थ 'जे आधी आत आलं, ते आधी बाहेर जाईल'. म्हणजे, आधी आणलेल्या वस्तू आधी वापरायच्या. नवीन वस्तू फ्रिजमध्ये मागे ठेवा आणि जुन्या वस्तू पुढे ठेवा. यामुळे कोणतीही वस्तू खराब होण्याआधी वापरली जाईल.

आठवड्यातून एकदा स्वच्छता करा

फ्रिज स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. आठवड्यातून किमान एकदा तरी एक्सपायर झालेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू बाहेर काढून टाका आणि फ्रिजचे शेल्फ स्वच्छ करा. यामुळे फ्रिजमध्ये कोणताही वास येणार नाही आणि तो नेहमी व्यवस्थित राहील.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

T-shirt Reuse: जुन्या पोलो टी-शर्टचं काय करता? फेकू नका, बनवा 'या' 5 उपयोगी वस्तू!
DIY Crafts: अंड्यांच्या ट्रे फेकून देताय? थांबा! या ५ भारी वस्तू बनवा, घर दिसेल सुंदर