DIY Crafts: अंड्यांच्या ट्रे फेकून देताय? थांबा! या ५ भारी वस्तू बनवा, घर दिसेल सुंदर

Published : May 05, 2026, 05:44 PM IST
diy crafts Easy Bottle reuse like hand wash bottle oil spray bottle coconut water bottle Sauce Coca Cola

सार

अंड्यांच्या ट्रेचा वापर करून तुम्ही सुंदर फुलं, केसात माळण्यासाठी गजरा, वॉल हँगिंग, रोपं लावण्यासाठी सीडलिंग पॉट आणि मुलांसाठी गोंडस खेळणी बनवू शकता. या सर्व गोष्टी सोप्या, स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहेत.

Egg Tray Uses: तुमच्या घरी अंडी आणली जातात का? मग अंड्यांचे पुठ्ठ्याचे ट्रे नक्कीच येत असतील. अंडी संपल्यावर हे ट्रे तुम्ही फेकून देता? थांबा! या टाकाऊ ट्रेपासून तुम्ही अनेक क्रिएटिव्ह आणि उपयोगी वस्तू बनवू शकता. या वस्तू बनवायला सोप्या, स्वस्तात मस्त आणि पर्यावरणपूरक (eco-friendly) आहेत. अंड्यांच्या ट्रेपासून फुलं, रोपांसाठी पॉट्स आणि इतर अनेक गोष्टी कशा बनवायच्या याच्या काही भन्नाट आयडिया पाहूया.

अंड्यांच्या ट्रेपासून बनवा केसांसाठी सुंदर गजरा

इन्स्टाग्रामवर shreyaa.siddhartharora नावाच्या पेजवर अंड्यांच्या ट्रेचा वापर करण्याची एक खूपच क्रिएटिव्ह पद्धत शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये अंड्याच्या ट्रेपासून सुंदर फुलं कशी बनवायची हे दाखवलं आहे. यासाठी ट्रेचे छोटे-छोटे भाग कापून घ्या. त्यांना फुलांचा आकार द्या. आता ग्लूच्या मदतीने पाकळ्या एकमेकांना चिकटवा. गुलाबाच्या आकाराचं फूल तयार करा आणि त्याला लाल रंग द्या. अशाच प्रकारे २-३ फुलं बनवा. या फुलांना जुडा पिन लावून तुम्ही केसांमध्ये माळू शकता आणि एक नवी हेअर स्टाईल करू शकता. सोशल मीडियावर हा हॅक खूप व्हायरल होत आहे.

 

 

हँगिंग टॉय (Hanging Toy) बनवा

अंड्यांचे ट्रे कापून तुम्ही अशाप्रकारे हँगिंग टॉयसुद्धा बनवू शकता. ट्रेचे कप कापून घ्या आणि त्यांना बाहुलीच्या आकारात चिकटवा. त्यांना रंगीबेरंगी कलर करा, टोपी घाला आणि दोरी बांधून खिडकी, दरवाजा किंवा झाडावर लटकवा.

वॉल हँगिंग म्हणून करा वापर

अंड्यांच्या ट्रेपासून तुम्ही खूप सुंदर वॉल हँगिंगही बनवू शकता. चौकोनी आकाराच्या ट्रेवर लेस आणि पॉम-पॉम लटकन लावा. त्याला दोन रंगांमध्ये पेंट करा, मध्ये काही खडे लावून डिझाइन करा आणि भिंतीवर लावून एक सुंदर हँगिंग क्राफ्ट तयार करा.

सीडलिंग ट्रे (Seedling Tray) म्हणून करा वापर

अंड्यांच्या ट्रेचा वापर तुम्ही रोपांसाठी बी उगवण्यासाठीही करू शकता. ट्रेच्या प्रत्येक कपमध्ये माती आणि बी टाका आणि छोटी रोपं तयार करा. नंतर ही रोपं तुम्ही मोठ्या कुंडीत लावू शकता. किचन गार्डनिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

मुलांसाठी बनवा गोंडस खेळणी

अंड्यांच्या ट्रेचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांसाठी गोंडस कासव किंवा कुत्रा बनवू शकता. ही खेळणी मुलांना खेळायलाही आवडतील आणि ही एक 'झिरो वेस्ट' आयडियासुद्धा आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Bottle Fountain: घरातल्या रिकाम्या बाटलीपासून फक्त ५० रुपयांत बनवा सुंदर कारंजं!
सॅमसंग कंपनीचा हा प्रीमियम फोन झाला स्वस्त, किंमत ऐकून व्हाल थक्क