
Purani T-shirt Se Kya Banaye: आपल्या सगळ्यांच्याच घरी जुने कॉलरवाले पोलो टी-शर्ट्स पडून असतात. आपण एकतर ते कोणालातरी देतो किंवा सरळ पुसायला वापरतो. पण थांबा! हेच जुने टी-शर्ट्स तुम्ही खूप क्रिएटिव्ह पद्धतीने वापरू शकता. यापासून टोट बॅग, कुशन कव्हर आणि हेअरबँडसारख्या वस्तूही बनवता येतात. चला, पाहूया कसं...
जुन्या टी-शर्टच्या मदतीने तुम्ही एक स्टायलिश टोट बॅग बनवू शकता. टी-शर्ट सरळ जमिनीवर ठेवा. त्याच्या दोन्ही बाह्या (sleeves) कापून टाका. गळ्याचा भाग थोडा मोठा कापून घ्या, जेणेकरून बॅगला हँडल तयार होईल. टी-शर्टच्या खालच्या बाजूला छोट्या-छोट्या गाठी मारा. झाली तुमची मोठी टोट बॅग तयार! यात तुम्ही पुस्तकं किंवा भाजीपाला ठेवू शकता.
हे पण वाचा- तुटलेल्या प्लास्टिकच्या टोपल्या फेकू नका, 'या' स्मार्ट पद्धतींनी पुन्हा वापरा
तुमच्याकडे जर एखादा कोटेशन लिहिलेला पोलो टी-शर्ट असेल, तर त्यापासून तुम्ही घरासाठी एक ट्रेंडी कुशन कव्हर बनवू शकता. टी-शर्ट तुमच्या उशीच्या मापाने कापून घ्या. दोन्ही बाजू आतल्या बाजूने दुमडा. तीन बाजूंनी शिलाई मारा. एक बाजू उघडी ठेवा, जेणेकरून त्यात कुशन घालता येईल. उशी आत टाकल्यावर शेवटची बाजूही शिवून घ्या.
जुन्या टी-शर्टपासून तुम्ही हेडबँड किंवा हेअरबँडही बनवू शकता. यासाठी टी-शर्टच्या लांब-लांब पट्ट्या कापा. त्यांना थोडं खेचा म्हणजे त्या गोल होतील. आता डोक्याच्या मापानुसार त्या बांधा किंवा शिवून घ्या. तुमचा स्टायलिश हेअरबँड तयार आहे.
जुन्या टी-शर्टचा वापर करून तुम्ही घरासाठी डोअर मॅट (पायपुसणं) बनवू शकता. टी-शर्टच्या लांब पट्ट्या कापून घ्या. तुम्ही दोन-तीन टी-शर्ट्स एकत्र वापरू शकता. तीन पट्ट्या घेऊन त्यांची वेणी घाला. एक लांब दोरी तयार झाल्यावर तिला गोल फिरवत शिवून घ्या. तुमचं सुंदर डोअर मॅट तयार होईल.
जुन्या टी-शर्टचे चौकोनी तुकडे कापून आणि ते एकमेकांना जोडून तुम्ही एक बेड तयार करू शकता. विशेषतः तुमच्या घरी जर पाळीव प्राणी (पेट) असेल, तर त्याच्या बसण्यासाठी तुम्ही टी-शर्टचा वापर करून पेट बेड बनवू शकता. याच्या आत थोडा कापूस भरून तुम्ही त्याला मऊ आणि आरामदायक बनवू शकता.