चहा, कॉफी वारंवार गरम करू नये
नातेवाईक किंवा मित्रमंडळी घरी आली की त्यांना चहा, कॉफी देण्याची पद्धत असते. कधीकधी सकाळी केलेला चहा शिल्लक राहतो. तो गरम करून दिला जातो. चहाच्या दुकानातही जुना चहा वारंवार गरम करून दिला जातो. तो चविष्ट वाटत असला तरी वारंवार गरम केलेल्या चहा, कॉफीमधील पोषक घटक नष्ट होतात. चहाच्या पानातील, कॉफीच्या बीन्समधील चवही बदलते. त्यात हानिकारक जिवाणू तयार होऊन शरीरात जातात आणि आरोग्य समस्या निर्माण करतात.