सॅटनरचा गौप्यस्फोट, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे बुडवले पैसे

Published : Jun 03, 2026, 11:00 PM IST
Mumbai Indians

सार

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सॅटनरने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीवर आयपीएल 2026 च्या करारातील पूर्ण मानधन न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागल्यानंतर त्याला दोन कोटी रुपयांपैकी केवळ अर्धीच रक्कम मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. 

आयपीएल 2026 संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मुंबई इंडियन्स संघ नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मिशेल सॅटनर याने फ्रँचायझीवर करारातील पूर्ण मानधन न दिल्याचा आरोप केला असून क्रिकेट वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गंभीर दुखापतींचा केला सामना 

यंदाच्या हंगामात सँटनरला दुखापतींनी मोठा फटका बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती आणि त्याच्या जागी केशव महाराज याची निवड करण्यात आली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून फारच कमी सामने खेळू शकला. एका पॉडकास्टमध्ये बोलताना सँटनरने सांगितले की, त्याने संघासाठी खेळताना गंभीर दुखापतींचा सामना केला, मात्र त्यानंतरही त्याला करारातील संपूर्ण रक्कम मिळाली नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, दोन कोटी रुपयांच्या करारापैकी केवळ अर्धेच पैसे त्याच्या खात्यात जमा करण्यात आले.

सर्वांचे लक्ष लागले 

सँटनरने दुखापतींची माहिती देताना सांगितले की, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पुनरागमन केल्यावर डाव्या खांद्यालाही दुखापत झाली. या दुहेरी धक्क्यामुळे त्याचा संपूर्ण हंगाम जवळपास वाया गेला आणि त्याला केवळ काही सामने खेळण्याची संधी मिळाली. या प्रकरणामुळे आयपीएलमधील खेळाडूंच्या मानधनाच्या नियमांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. स्पर्धेच्या काळात किंवा संघाच्या अधिकृत कामगिरीदरम्यान खेळाडू जखमी झाल्यास त्याला पूर्ण करार रक्कम देण्याची तरतूद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सँटनरच्या दाव्यात किती तथ्य आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सँटनरला उर्वरित मानधन नंतर मिळणार आहे की प्रत्यक्षात रक्कम कपात करण्यात आली आहे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आरोपांमुळे आयपीएलनंतरचा क्रिकेटमधील सर्वात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Kapil Dev: वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, विनोद कांबळीचं दिलं उदाहरण
Sanju Samson Batting: संजू सॅमसनची वादळी खेळी, दुसऱ्या टी-20 मध्ये विंडीजसमोर 250 धावांचं डोंगराएवढं आव्हान