Viral Video : स्मृती मानधनाची लव्हस्टोरी पुन्हा ट्रॅकवर? 'तो' व्हिडीओ व्हायरल

Published : Apr 09, 2026, 02:51 PM IST

Smriti Mandhana and Palash Muchhal Relationship : भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार बॅटर स्मृती मानधनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता एका व्हायरल व्हिडीओमुळे हे दोघं पुन्हा एकत्र आल्याचं बोललं जातंय.

PREV
15
व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा चर्चा
सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतोय. यात पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छल, स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांच्यासोबत दिसतेय. पलक आदराने श्रीनिवास यांच्या पाया पडून आशीर्वाद घेताना दिसतेय. यामुळे दोन्ही कुटुंबांतील संबंध पुन्हा सुधारल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. त्यामुळे स्मृती आणि पलाशच्या लग्नाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
25
आधी लग्न मोडल्याच्या चर्चा
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या होत्या. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांचं लग्न होणार होतं, असंही म्हटलं गेलं. लग्नासंबंधी काही कार्यक्रमही झाल्याची माहिती होती. पण अचानक लग्न मोडल्याने चाहते आश्चर्यचकित झाले होते.
35
वाद आणि अफवांचं पेव
लग्न मोडण्यामागे नेमकं काय कारण होतं, यावर अनेक तर्कवितर्क लढवले गेले. काही रिपोर्ट्सनुसार, पलाश दुसऱ्या मुलीसोबत चॅटिंग करत असल्याचे स्क्रीनशॉट समोर आले होते. त्यामुळेच स्मृतीने लग्न मोडल्याची चर्चा होती. मात्र, दोन्ही कुटुंबांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
45
हा व्हिडीओ जुना की नवा?
सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ नवा आहे की जुना, याबाबत स्पष्टता नाही. काहींच्या मते हा जुन्या कार्यक्रमातील व्हिडीओ असू शकतो. तर काही जण म्हणत आहेत की, दोन्ही कुटुंबं नुकतीच भेटली आणि त्यांच्यातील मतभेद मिटले आहेत. मात्र, स्मृती किंवा पलाशच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

55
चाहत्यांची उत्सुकता वाढली
स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेटमधील एक लोकप्रिय खेळाडू आहे. मैदानावर तिच्या खेळाची जेवढी चर्चा होते, तेवढीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चाहत्यांना उत्सुकता असते. या व्हायरल व्हिडीओमुळे स्मृती-पलाशच्या नात्याबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. हे जोडपं खरंच पुन्हा एकत्र येणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Photos on

Recommended Stories