स्मृती मानधनाने लग्नाच्या पोस्ट केल्या डिलिट, वाचा आतापर्यंत काय काय घडले, वाचा पलाशबदद्ल सबकूछ!

Published : Nov 25, 2025, 10:22 AM IST

Smriti Mandhana and Palash Muchhal : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा शाही विवाह सोहळा सांगलीला होणार होता. परंतु, स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खराब झाल्याने तो रद्द झाला. तो कायमचा रद्द झाल्याचा चर्चाही सुरु आहे. 

PREV
17
लग्नाच्या बेडीत अडकणार स्टार क्रिकेटर

भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना चित्रपट निर्माता आणि संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न करणार होती. सांगलीत मोठा लग्नसमारंभ आयोजित करण्यात आला होता. परंतु, लग्नात प्रकृती बिघडल्याने स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

27
पलाश मुच्छलही रुग्णालयात

स्मृती मानधनाचा होणारा पती पलाश मुच्छल यालाही रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या प्रकृतीची नेमकी माहिती समोर आली नाही. परंतु, त्याच्यावरही उपचार सुरु असल्याचे समजते. आज त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या दरम्यान, स्मृती आणि तिच्या मैत्रिणींनी लग्नाच्या सर्व पोस्ट डिलिट केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे जोरदार अफवा पसरल्या आहेत. दोघांनी लग्न कायमचे रद्द केले आहे, असेही सांगितले जात आहे.

37
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका

पलाश मुच्छल हे संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. तो एका संगीत कुटुंबातून येतो. त्याची बहीण पलक मुच्छल ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिने "प्रेम रतन धन पायो" सारखी गाणी गायली आहेत.

47
करिअरची सुरुवात

पलाशबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 2014 मध्ये "ढिश्कियाऊं" या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने 'भूतनाथ रिटर्न्स', 'पार्टी तो बनती है' आणि 'तू ही है आशिकी' सारख्या सुपरहिट गाण्यांना संगीत दिले.

57
चित्रपटांचे दिग्दर्शन

पलाशने केवळ संगीतातच नव्हे, तर अभिनयातही आपले कौशल्य दाखवले आहे. तो "खेले हम जी जान से" या चित्रपटात दिसला होता. त्याने अनेक म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.

67
पलाश मुच्छलची एकूण संपत्ती

Siasatdaily.com च्या वृत्तानुसार, पलाश मुच्छलची एकूण संपत्ती सुमारे 20 ते 41 कोटी रुपये आहे. संगीत दिग्दर्शनाव्यतिरिक्त, तो चित्रपट प्रकल्प आणि लाइव्ह शोमधूनही कमाई करतो.

77
एकूण संपत्ती 50 ते 75 कोटी रुपये

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, दोघेही 2019 पासून डेटिंग करत आहेत. आता ते लग्न करणार आहेत. पलाश आणि स्मृती मानधना यांची एकूण संपत्ती सुमारे 50 ते 75 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

Read more Photos on

Recommended Stories