Sanju Samson: टी-20 वर्ल्ड कप फायनल तोंडावर आला असताना, संजू सॅमसनकडे एक मोठी संधी आहे. महत्त्वाच्या मॅचेसमध्ये दमदार कामगिरी करून तो विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यानंतर 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' बनणारा तिसरा भारतीय ठरू शकतो.
आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपचा पडदा पडेल. क्रिकेट जग फक्त विजेत्या संघाकडेच नाही, तर या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण असेल याकडेही लक्ष ठेवून आहे. वर्ल्ड कपमधील दमदार कामगिरीमुळे भारताचा संजू सॅमसन या शर्यतीत आघाडीवर आहे.
213
हिरोसारखी दमदार वापसी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या व्हर्च्युअल क्वार्टर फायनलमध्ये (97 धावा) आणि इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये (89 धावा) संजू टॉप स्कोरर ठरला. आता फायनलमध्येही चांगली कामगिरी केल्यास तो 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' बनू शकतो. हा मान मिळाल्यास तो विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहनंतरचा तिसरा भारतीय ठरेल. त्याचा 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो.
313
कोहलीच्या नावावर अनोखा विक्रम
विराट कोहली 2014 आणि 2016 मध्ये वर्ल्ड कपचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. दोन वेळा हा पुरस्कार जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. 2024 मध्ये भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यावर 15 विकेट्स घेणारा बुमराह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून आठ खेळाडूंनी 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार जिंकला आहे. 2007 च्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये भारत चॅम्पियन झाला, पण पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (91 धावा, 12 विकेट्स) स्पर्धेचा मानकरी ठरला.
513
२००९: तिलकरत्ने दिलशान
2009 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला हरवून पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. पण श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने सात सामन्यांमध्ये 317 धावा केल्या होत्या.
613
२०१०: केविन पीटरसन
2010 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला नमवून वर्ल्ड कप जिंकला. तेव्हा सहा सामन्यांमध्ये 248 धावा करणारा केविन पीटरसन स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.
713
२०१२: शेन वॉटसन
2012 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने मैदान गाजवले. त्याने स्पर्धेत 249 धावा करण्यासोबतच 11 विकेट्सही घेतल्या होत्या आणि तो 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' ठरला.
813
२०१४: विराट कोहली
2014 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला. पण सहा सामन्यांत 319 धावा करणारा विराट कोहली स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
913
२०१६: पुन्हा विराट!
2016 मध्ये वेस्ट इंडिजने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. पण पाच सामन्यांमध्ये 273 धावा करणारा विराट कोहली सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचा मानकरी ठरला.
1013
२०२१: डेव्हिड वॉर्नर
2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवून पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी सात सामन्यांत 289 धावा करणारा डेव्हिड वॉर्नर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू होता.
1113
२०२२: सॅम करन
2022 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानला हरवून दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला. तेव्हा सहा सामन्यांमध्ये 12 विकेट्स घेणारा सॅम करन स्पर्धेचा मानकरी ठरला होता.
1213
२०२४: जसप्रीत बुमराह
2024 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचा सिंहाचा वाटा होता. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने 15 विकेट्स घेतल्या आणि तो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
1313
संजूसोबत शर्यतीत आणखी ७ जण
'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट'च्या शर्यतीत संजूसोबत आणखी सात खेळाडू आहेत. यात इंग्लंडचा विल जॅक्स, पाकिस्तानचा साहिबजादा फरहान, दक्षिण आफ्रिकेचा लुंगी एन्गिडी आणि एडन मार्करम, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि टिम सायफर्ट, आणि ग्रुप स्टेजमध्ये बाहेर पडलेल्या अमेरिकेचा शॅडली वॅन शाल्कविक यांचा समावेश आहे.