चेन्नई सुपर किंग्सला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच, एका माजी क्रिकेटपटूने धोनीबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या आयपीएल हंगामापूर्वी, चेन्नई सुपर किंग्सने धोनीला अनकॅप्ड नियमांचा वापर करून फक्त ४ कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. पण दुखापतीमुळे धोनीला खेळता आलं नाही. आता पुढच्या आयपीएल हंगामात धोनी खेळणार की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नाही.
26
धोनीला 'इम्पॅक्ट प्लेअर'ची भूमिका नकोय
चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझी धोनीला फक्त 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून वापरण्याच्या विचारात आहे. पण धोनीला ही भूमिका साकारायला आवडत नाही, असं मत CSK चा माजी क्रिकेटपटू एस. बद्रीनाथने व्यक्त केलं आहे.
36
पूर्ण २० ओव्हर्स खेळण्यावर धोनीचा भर
जेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा संघ मैदानात उतरतो, तेव्हा धोनीला पूर्णवेळ विकेटकीपर-बॅटर म्हणून खेळायचं असतं. फक्त बॅटिंगसाठी मैदानात उतरण्याऐवजी, पूर्ण २० ओव्हर्स मैदानात राहणं त्याला जास्त पसंत आहे, असं बद्रीनाथ म्हणाला.
बद्रीनाथने खुलासा केला, 'धोनीने स्वतः मला सांगितले की तो 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून खेळणार नाही. तो स्वतःला पूर्णवेळ विकेटकीपर मानतो, म्हणजेच त्याला सामन्याच्या पूर्ण २० ओव्हर्स मैदानात राहावे लागेल. त्यामुळे त्याला ही भूमिका नकोय. तो पूर्णवेळ मैदानात राहिल्यास CSK साठी ते अधिक फायदेशीर ठरेल'.
56
धोनीच्या 'इम्पॅक्ट प्लेअर' भूमिकेवर बद्रीनाथचं मत
बद्रीनाथ पुढे म्हणाला, 'स्वतः फ्लेमिंगनेही सांगितलं आहे की धोनीचं शरीर जास्त वेळ खेळण्याचा ताण सहन करू शकत नाही. तो फक्त १६ व्या ओव्हरनंतर बॅटिंगला येईल आणि विकेटकीपिंग करेल. त्याची भूमिका मर्यादित असल्याने, 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून तो एक उत्तम पर्याय ठरू शकतो'.
66
बद्रीनाथच्या विधानामुळे क्रिकेट विश्वात खळबळ
एकीकडे धोनीने CSK मध्ये भागीदारी मागितल्याची आणि दोघांमधील संबंध बिघडल्याची चर्चा सुरू आहे. अशातच बद्रीनाथच्या या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. आता पुढच्या आयपीएल हंगामात धोनी पूर्णवेळ खेळाडू म्हणून उतरणार की इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दिसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.