Rohit Sharma Becomes Number One ODI Batsman : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट रँकिंगमध्ये एक मोठा विक्रम केला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्माने आपल्या 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय फलंदाजी रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवून विक्रम केला आहे.
27
यापूर्वी रोहित दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता
यापूर्वी रोहित शर्मा जुलै 2018 मध्ये आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता. पण पहिल्यांदाच तो अव्वल ठरला आहे.
37
वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 बनलेला सर्वात वयस्कर खेळाडू
होय, 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा, आयसीसी एकदिवसीय रँकिंगमध्ये नंबर 1 स्थान मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 121 धावा करून रोहित शर्माने शुभमन गिलला मागे टाकत यादीत पहिले स्थान मिळवले आहे.
57
रोहितचे 781 रेटिंग गुण
आता रोहितचे 781 रेटिंग गुण आहेत, तर अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान 764 आणि शुभमन गिल 745 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
67
कोहलीची सहाव्या स्थानी घसरण
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद झालेला आणि शेवटच्या सामन्यात नाबाद अर्धशतक करणारा कोहली सहाव्या स्थानी घसरला आहे. तर श्रेयस अय्यर नवव्या स्थानी पोहोचला आहे.
77
अक्षर पटेलची 31 स्थानांनी झेप
दरम्यान, स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने गोलंदाजांच्या यादीत 6 स्थानांची झेप घेत 31 वे स्थान गाठले आहे.