
मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू आहेत. हे दोन्ही खेळाडू आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून त्यांनी आधीच टेस्ट आणि आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. सध्या 'रो-को' जोडी फक्त वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या दोन्ही दिग्गजांची नजर आता २०२७ च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपवर आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पगार आता बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्यापेक्षा कमी झाला आहे, कारण त्यांनी टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण असं असलं तरी, 'रो-को' जोडी त्यांच्या स्वतःच्या बिझनेस आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते.
२०२६-२७ च्या बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बदल करण्यात आले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आतापर्यंत 'ए+' (A+) ग्रेडमध्ये होते, पण टेस्ट आणि टी-20 मधून निवृत्ती घेतल्यामुळे त्यांना 'बी' (B) ग्रेडमध्ये डिमोट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबतच कोहली आणि रोहितलाही बीसीसीआयकडून वर्षाला ३ कोटी रुपये पगार मिळत आहे.
बीसीसीआयच्या नियमांनुसार, एका टेस्ट मॅचसाठी खेळाडूला १५ लाख रुपये, एका वनडे मॅचसाठी ६ लाख रुपये आणि एका टी-20 मॅचसाठी ३ लाख रुपये मॅच फी मिळते. सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा फक्त वनडे मॅचेस खेळत असल्यामुळे ते प्रत्येक मॅचसाठी ६ लाख रुपये मॅच फी घेतात.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.