Mitchell Santner: मिचेल सँटनरने रचला इतिहास, भारताला नडणारा ठरला नंबर 1 कीवी बॉलर

vivek panmand   | CMS
Published : Oct 30, 2026, 08:51 PM IST
Mitchell Santner: मिचेल सँटनरने रचला इतिहास, भारताला नडणारा ठरला नंबर 1 कीवी बॉलर

सार

भारतासोबतच्या चौथ्या T20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने आपली हवा दाखवून दिलीये. T20 इंटरनॅशनलमध्ये त्याने १५० विकेट्सचा टप्पा पार केलाय. असा पराक्रम करणारा तो न्यूझीलंडचा फक्त तिसरा बॉलर ठरला आहे. यासोबतच इश सोढीचा रेकॉर्ड मोडून भारतापुढं सर्वात घातक ठरलेला कीवी बॉलरही तोच बनलाय.

ऑकलंड: भारतासोबत झालेल्या चौथ्या T20 मॅचमध्ये न्यूझीलंडचा कॅप्टन मिचेल सँटनरने आपल्या जबरदस्त बॉलिंगने एक नवा इतिहास रचलाय. या मॅचमध्ये ४ ओव्हर्समध्ये अवघे २४ रन देत त्याने अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी या दोन महत्त्वाच्या बॅटर्सना आऊट केलं. यासोबतच T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १५० विकेट्स घेणारा तो न्यूझीलंडचा तिसरा बॉलर ठरलाय. सँटनरच्या नावावर आता १४२ T20 मॅचेसमध्ये २३.०९ च्या सरासरीने १५१ विकेट्स जमा झाल्या आहेत.

सँटनरने आतापर्यंत चार वेळा एकाच मॅचमध्ये ४ विकेट्स घेण्याची किमया साधलीय. ११ रन देऊन ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. चालू सीरिजमध्ये तर सँटनरचा भलताच फॉर्म दिसतोय, त्याने ११.२२ च्या सरासरीने आतापर्यंत ९ विकेट्स खिशात घातल्या आहेत. तर २०२६ या एकाच वर्षात खेळलेल्या २० मॅचेसमध्ये त्याच्या नावावर २१ विकेट्स जमा झाल्या आहेत. भारता विरुद्ध सर्वात जास्त T20 विकेट्स घेण्याचा मोठा रेकॉर्ड आता सँटनरच्या नावावर जमा झालाय. इश सोढीचा ३० विकेट्सचा रेकॉर्ड मोडून सँटनरने भारतासोबतच्या ३१ मॅचेसमध्ये ३२ विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय.

न्यूझीलंडसाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या लिस्टमध्ये इश सोढी (१४२ मॅचेसमध्ये १६५ विकेट्स) पहिल्या क्रमांकावर आहे आणि टिम साउदी (१२६ मॅचेसमध्ये १६४ विकेट्स) दुसऱ्या नंबरवर आहे. आता सँटनर त्यांच्या अगदी जवळ पोहोचत तिसऱ्या नंबरवर भक्कम उभा आहे.

मॅचबद्दल बोलायचं तर, ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या चौथ्या T20 मॅचमध्ये न्यूझीलंडने भारताचा ८७ रन्सने धुव्वा उडवला. जेकब डफीची धारदार बॉलिंग आणि ग्लेन फिलिप्सची वादळी सेंच्युरी याच्या जोरावर न्यूझीलंडने या सीरिजमधील आपला पहिला विजय नोंदवला. न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करत २० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावून २५९ रन्सचा डोंगर उभा केला होता. ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ बॉलमध्ये ६ फोर आणि १० सिक्स मारत १०७ रन्स ठोकले, तर मायकेल ब्रेसवेलने २५ बॉलमध्ये ४ फोर आणि ६ सिक्सच्या मदतीने ६५ रन्सची धुवांधार इनिंग खेळली.

२६० रन्सच्या डोंगरासारख्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय बॅटर्सची दाणादाण उडाली. जेकब डफी (४/२३), मिचेल सँटनर (२/२४) आणि मॅथ्यू फिशर (२/४०) यांच्या शिस्तबद्ध बॉलिंगसमोर भारतीय टीम ढेपाळली. पूर्ण २० ओव्हर्समध्ये भारत १७२ रन्सवर ऑलआऊट झाला. भारताकडून तिलक वर्माने ३५ बॉलमध्ये ३५ रन्स करत सर्वाधिक स्कोअर केला.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Sanjay Manjrekar: संजय मांजरेकरांनी अलिबागची जमीन २२.४० कोटींना विकली!
Kuldeep Yadav: कुलदीप आणि वरुण प्लेईंग-11 बाहेर का? बॉलिंग कोच साईराज बहुतुले यांनी सांगितलं खरं कारण