Kapil Dev: वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, विनोद कांबळीचं दिलं उदाहरण

vivek panmand   | CMS
Published : Oct 09, 2026, 09:47 PM IST
Kapil Dev: वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, विनोद कांबळीचं दिलं उदाहरण

सार

युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबद्दल महान खेळाडू कपिल देव यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंट असून चालत नाही, तर प्रसिद्धी कशी हाताळता हेही महत्त्वाचं असतं, असं सांगत त्यांनी विनोद कांबळीचं उदाहरण दिलंय.

यंग स्टार आणि टीम इंडियाचा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेट वर्तुळात चांगलाच चर्चेत आहे. आयपीएलनंतर अगदी लहान वयातच वैभवने क्रिकेट विश्वात मोठी प्रसिद्धी मिळवलीये. यामुळेच त्याची तुलना आता दिग्गज खेळाडूंशी केली जातेय. पण टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी वैभवच्या करिअर आणि या तुलनेवर केलेलं एक वक्तव्य सध्या खळबळ उडवतंय. करिअर फक्त टॅलेंटच्या जोरावर घडत नाही, असं सांगत त्यांनी वैभवला विनोद कांबळीचं उदाहरण दिलंय. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया.

दिग्गज कपिल देव काय म्हणाले?

वैभवच्या टॅलेंटबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही आणि मी त्यावर बोलणारही नाही. पण क्रिकेटचा इतिहास अशा अनेक खेळाडूंनी भरलेला आहे, ज्यांच्याकडे अफाट क्षमता होती पण ते स्वतःचं नाव मोठं करू शकले नाहीत, असं कपिल देव एका वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले.

क्रिकेटमध्ये टॅलेंटची कमी नाही!

वैभवबद्दल आत्ताच बोलणं खूप घाईचं ठरेल. क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आले ज्यांच्याकडे भरपूर टॅलेंट होतं, पण नंतर लोक त्यांना विसरून गेले. तुम्ही विनोद कांबळीकडेच पाहा, असं कपिल देव यांनी स्पष्ट केलं.

कांबळीसोबत नेमकं काय झालं?

विनोद कांबळी हा सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि भारतीय क्रिकेटमधल्या सर्वात टॅलेंटेड खेळाडूंपैकी एक होता. त्याची कसोटी सरासरी ५४.२० इतकी होती. एवढंच नाही तर, त्याने करिअरच्या सुरुवातीलाच दोन द्विशतकं झळकावली होती. पण मैदानाबाहेरच्या गोष्टी आणि सातत्याचा अभाव यामुळे त्याचं करिअर लवकरच संपुष्टात आलं, अशी जुनी आठवण कपिल देव यांनी ताजी केली.

वैभवला थोडा वेळ द्या!

एवढ्या लहान वयात मिळालेली प्रसिद्धी एखादा युवा खेळाडू कसा हाताळतो? हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे कपिल देव म्हणाले की, वैभव आता फक्त १५ वर्षांचा आहे, त्याला अजून तीन वर्षे द्या, मग आपण त्याच्यावर बोलू. जसजसं वय वाढतं तसतशी त्याची जीवनशैली बदलेल आणि त्याचे विचारही बदलतील. दोन वर्षांनंतर तो कसा वागतो, हे त्याच्या आत्ताच्या कामगिरीपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरेल, असा मोलाचा सल्ला कपिल देव यांनी दिलाय.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Sanju Samson Batting: संजू सॅमसनची वादळी खेळी, दुसऱ्या टी-20 मध्ये विंडीजसमोर 250 धावांचं डोंगराएवढं आव्हान
Marnus Labuschagne: मार्नस लाबुशेनचा शतकाचा दुष्काळ संपेना, २०२३ पासूनची आकडेवारी काय सांगते?