
बंगळुरू : आज RCB आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हायव्होल्टेज अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर, बागलकोट जिल्ह्यातील इलकल तालुक्यातील करडी गावातील RCB चाहते आपल्या संघाच्या विजयासाठी बसवण्णा देवाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत.
आरसीबीच्या चाहत्यांनी विशेष पूजा आयोजित केली होती. या पूजेला गावातील क्रिकेट चाहत्यांसह इतरही नागरिक उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत आरसीबी हा कप जिंकेल, अशी मनोकामना यावेळी व्यक्त करण्यात आली. या पूजेची अवघ्या कर्नाटकात चर्चा आहे. इतरही गावांमध्ये अशा पूजा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
चाहत्यांनी देवाला १०१ नारळ फोडून, RCB चा विजय व्हावा अशी विशेष प्रार्थना केली आहे. 'यावेळी कप आपलाच' असा जयघोष करत, गावातील युवक आणि चाहते एकत्रित या पूजेत सहभागी झाले आहेत.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.