IPL 2025 Final RCB vs PBKS अखेर आरसीबीने इतिहास रचला, चषकावर नाव कोरले

Published : Jun 03, 2025, 09:26 AM ISTUpdated : Jun 03, 2025, 11:39 PM IST
IPL 2025 Final RCB vs PBKS अखेर आरसीबीने इतिहास रचला, चषकावर नाव कोरले

सार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज आयपीएल चषकासाठी झुंजले. अखेर आरसीबीची सरशी झाली. आरसीबीने आपले नाव चषकावर कोरले.

अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेल्या १९१ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जचे ७ गडी बाद झाले. आरसीबीने हा सामना ६ धावांनी जिंकला आहे. आयपीएल चषकावर नाव कोरण्यासाठी आरसीबीला तब्बल १८ वर्षे वाट बघावी लागली.

आज आयपीएलच्या इतिहासातील मोठा दिवस आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज आयपीएल चषकासाठी झुंजले. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयश अय्यरने टॉस जिंकला असून पहिल्या गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचा फिल सॉल्ट १६ धावांवर कॅच आऊट झाला आहे. तर अगरवाल २४ धावांवर कॅच आऊट झाला. रजत पाटीदार २६ धावांवर बाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एकूण १९० धावा झाल्या. त्यामुळे पंजाब किंग्जसमोर जिंकण्यासाठी १९१ धावांचे टार्गेट होते.

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर भारतीय संघातून बाहेर पडलेला आणि बीसीसीआयच्या कराराच्या यादीतही स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेला श्रेयस अय्यर गेल्या दीड वर्षापासून ज्याला स्पर्श करतोय ते सोनं होतंय.

गेल्या वर्षी मुंबईकडून रणजी ट्रॉफी जिंकलेल्या श्रेयसने नंतर आपल्याच नेतृत्वाखाली मुंबईला मुश्ताक अली टी २० ट्रॉफीही जिंकवून दिली. आयपीएलमध्ये केकेआरला विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस हा इराणी करंडक जिंकणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता. अलीकडेच जेव्हा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तेव्हा श्रेयस संघाचा महत्त्वाचा भाग होता. तो गेल्या १५ महिन्यांत आपली ६ वी ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.

गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदारचे संघ आमनेसामने आले होते. तेव्हा पाटीदारच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेशविरुद्ध अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई विजयी ठरली होती, त्यामुळे आज श्रेयस अय्यरवर सूड उगवण्यासाठी पाटीदार उत्सुक आहे. आणि तसेच झाले. पाटीदारच्या संघाने आयपीएल चषकावर नाव कोरले.

पुन्हा टी२० अंतिम सामन्यात रजत-श्रेयस संघांचा सामना

सलग दुसऱ्या वर्षी टी २० अंतिम सामन्यात रजत विरुद्ध श्रेयसच्या नेतृत्वाखालील संघ आमनेसामने आले. गेल्या वर्षी मुश्ताक अली टी२० अंतिम सामन्यात श्रेयसने मुंबईचे आणि रजतने मध्यप्रदेशचे नेतृत्व केले होते. मुंबई संघ विजयी ठरला होता.

९ वर्षांनी फायनलमध्ये आरसीबी

आरसीबी संघाने ४ थ्यांदा अंतिम सामना खेळला. यापूर्वी २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेला हा संघ पराभूत झाला होता, ९ वर्षांनी पुन्हा एकदा जेतेपदाच्या फेरीत खेळला. दुसरीकडे, पंजाब २०१४ मध्ये पहिल्यांदाच अंतिम सामन्यात पोहोचला होता. 

अंतिम सामन्यात ५ कन्नडिगा

यावेळी आयपीएल अंतिम सामन्यात पाच कन्नडिगा आहेत. आरसीबी संघातून मयंक अगरवाल, मनोज भांडगे आणि पंजाब संघातून वैशाख विजयकुमार, प्रवीण दुबे खेळणार आहेत. पंजाब किंग्ज संघाचे फिरकी प्रशिक्षक सुनील जोशी हे देखील कन्नडिगा आहेत.

समारोपाचा सोहळा भारतीय सैन्याला समर्पित

अंतिम सामन्यापूर्वी भव्य समारोपाचा सोहळा आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला होता. ऑपरेशन सिंधूरला मानवंदना म्हणून हा सोहळा भारतीय सैन्याला समर्पित करण्यात आला. प्रसिद्ध गायक शंकर महादेवनसह अनेक मान्यवर कलाकारांचे सादरीकरण केले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

'ऑस्ट्रेलिया दुबळ्यांसाठी नाही...', दारुण पराभवानंतर बेन स्टोक्स संतापला, क्रिकेटमध्ये संतापाची लाट!
स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, स्वतःच सोशल मीडियावरून दिली माहिती