या मालिकेचा शेवट जितका नाट्यमय होता, तितकेच चकित करणारे आकडे क्रिकेट इतिहासात नोंदले गेले. खालील काही विक्रम विशेष लक्षवेधी ठरले:
भारत आणि इंग्लंडने मिळून ७,१८७ धावा केल्या — ५ कसोटींमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक.
भारताने या मालिकेत एकूण ३,८०७ धावा केल्या — ५ कसोटी मालिकेतील भारताची सर्वोच्च धावसंख्या.
एकूण २१ शतकं नोंदवण्यात आली — कसोटी मालिकेतील संयुक्तरित्या सर्वाधिक.
भारताने इंग्लंडविरुद्ध एकाच मालिकेत १२ शतकं ठोकली — संयुक्त विक्रम.
दोन्ही संघांनी मिळून ५० वेळा ५०+ धावा केल्या — कसोटी मालिकेतील संयुक्त सर्वाधिक.
शुभमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा — या तीन भारतीय फलंदाजांनी ५००+ धावा केल्या. कसोटी मालिकेत असे करणारे पहिले भारतीय त्रिकूट.
५ पैकी ३ सामन्यांत पहिल्या डावाची आघाडी किंवा पिछाडी ३० धावांपेक्षा कमी होती — हा अत्यंत दुर्मीळ प्रकार आहे.
१७ वेगवेगळ्या खेळाडूंनी शतकं किंवा ५ बळी घेऊन Honours Boardवर आपले नाव कोरले — हा विक्रम आहे.
एकाच मालिकेत एकूण २१ शतकं + ८ पंचकारे = २९ वैयक्तिक कामगिरींचा विक्रम.
४५ वेळा फलंदाज बोल्ड झाले — १९८४ नंतरचा सर्वाधिक आणि इंग्लंडमध्ये १९७६ नंतरचा सर्वोच्च.