Anderson Tendulkar ट्रॉफी अंतर्गत इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडल्यानंतर, टीम इंडियाला सुमारे दोन महिने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटपासून विश्रांती मिळणार आहे.
भारताचा पुढचा कसोटी दौरा ऑक्टोबर 2025 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटीसाठी असणार आहे. पहिली कसोटी अहमदाबादमध्ये 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान, तर दुसरी दिल्लीमध्ये 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर दोन कसोटी सामने खेळेल. हा 2025 सालातील शेवटचा कसोटी सामना असेल.
25
ऑगस्टमध्ये श्रीलंका आणि ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौरा
2026 मध्ये भारत अफगाणिस्तानविरुद्ध एकच कसोटी सामना जून महिन्यात घरच्या मैदानावर खेळेल. त्यानंतर ऑगस्टमध्ये श्रीलंका आणि ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौरे असतील. 2027 मध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच कसोटींची मालिका खेळेल, जी WTC 2025-27 सायकलची अंतिम मालिका असेल.