India Women vs Sri Lanka Women : कालची मॅच कोणी जिंकली? मराठमोळ्या स्मृती मंधानाने किती धावा केल्या?

Published : Oct 01, 2025, 07:37 AM IST

India Women vs Sri Lanka Women : विश्वचषक 2025 च्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेवर 58 धावांनी विजय मिळवला. अमनजोत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

PREV
15
विजयाने वर्ल्ड कप 2025 प्रवासाला सुरुवात ( India Women vs Sri Lanka Women )

आयसीसी महिला विश्वचषक 2025 ची सुरुवात भारताने विजयाने केली. पावसामुळे सामना 47 षटकांचा झाला. भारताने 269/8 धावा केल्या, तर श्रीलंका 211 धावांवर ऑलआऊट झाली.

25
भारताची डगमगणारी फलंदाजी ( India Women vs Sri Lanka Women )

भारताच्या फलंदाजीला सुरुवातीलाच धक्के बसले. स्मृती मानधना (8) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (21) लवकर बाद झाल्या. संघ 124/6 अशा स्थितीत दबावात आला होता.

35
दीप्ती शर्मा-अमनजोत यांची भागीदारी ( India Women vs Sri Lanka Women )

कठीण काळात दीप्ती शर्मा (53) आणि अमनजोत कौर (57) यांनी संघाला सावरले. या दोघींनी सातव्या विकेटसाठी 103 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाची धावसंख्या 269 पर्यंत पोहोचवली.

45
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव कोसळला ( India Women vs Sri Lanka Women )

271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 45.4 षटकांत 211 धावांवर ऑलआऊट झाला. कर्णधार चमारी अटापट्टूने सर्वाधिक 43 धावा केल्या.

55
भारत vs श्रीलंका सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व ( India Women vs Sri Lanka Women )

या विजयासह भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप 2025 ची यशस्वी सुरुवात केली. फलंदाजीत दीप्ती-अमनजोत तर गोलंदाजीत दीप्ती शर्मा (3) आणि स्नेह राणा (2) यांनी महत्त्वाची कामगिरी केली.

Read more Photos on

Recommended Stories