Smriti Mandhana : मैदानाबाहेर कशी दिसते स्मृती मंधाना? मुळची कुठली? कोणाला करतेय डेट?

Published : Sep 30, 2025, 10:53 PM IST

Smriti Mandhana : महिला क्रिकेट विश्वचषकाचा पहिला सामना ३० सप्टेंबर रोजी भारत-श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्मृती मानधना बॅटने फारशी कमाल करू शकली नाही. पण तिची गणना टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. जाणून घ्या..

PREV
19
नॅशनल क्रश

स्मृती मानधना ही भारतातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिला 'नॅशनल क्रश' असेही म्हटले जाते. ती मैदानावर जेवढी चर्चेत असते तेवढीच मैदानाबाहेरही चर्चेत राहते. तिच्या फॅन्सची संख्या मोठी आहे.

29
मारवाडी कुटुंब

स्मृती मानधनाचा जन्म १८ जुलै १९۹६ रोजी मुंबईत एका मारवाडी कुटुंबात झाला. तिचे वडील केमिकल डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करायचे. त्यांचा मुंबईत व्यवसाय होता. परंतु, त्यांनी काही कारणास्तव सांगतीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

39
सांगलीत शिक्षण

स्मृती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब सांगलीला शिफ्ट झाले. तिने येथील चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिक्षण घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या अंडर-१५ संघात निवड झाली. तेव्हापासून तिची बॅट सातत्याने तळपत आहे. 

49
सलामीची फलंदाज

वयाच्या १५ व्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या अंडर-१५ संघात निवड झाली. स्मृती उजव्या हाताची सलामीची फलंदाज आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते. तिला भारतीय संघातील रन मशिन असेही म्हटले जाते.

59
पुरस्कार

स्मृती मानधनाला 'क्रिकेटर ऑफ द इयर' आणि 'वनडे क्रिकेटर ऑफ द इयर'सह चार आयसीसी पुरस्कार मिळाले आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये, आयसीसीने तिला 'क्रिकेटर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले. तिला असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

69
लग्नाच्या अफवा

स्मृती मानधना २०१९ पासून संगीतकार आणि चित्रपट निर्माता पलाश मुच्छलला डेट करत आहे. तो प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. मध्यंतरी दोघांच्या लग्नाच्या अफवाही पसरल्या होत्या. 

79
उत्कृष्ट फलंदाज

मानधनाने ऑगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध वर्मस्ले पार्कमध्ये कसोटी पदार्पण केले. तिने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे २२ आणि ५१ धावा केल्या होत्या. ती बॅटिंग करत असली तर दुसर्या टीमच्या बॉलरला घाम फुटतो असे म्हटले जाते. मोठी धावसंख्या बनवण्यासाठी ती ओळखली जाते.

89
अशी झाली सुरवात

स्मृतीने १० एप्रिल २०१३ रोजी बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीला सुरुवात केली. या सामन्यात तिने २५ धावा केल्या होत्या. तेव्हापासून तिने मागे वळून बघितले नाही. 

99
असा राहिला स्कोअर

स्मृती मानधनाने ५ एप्रिल २०१३ रोजी वडोदरा येथे बांगलादेशविरुद्ध तिच्या टी-२० कारकिर्दीला सुरुवात केली. या सामन्यात तिने ३९ धावा केल्या होत्या.

Read more Photos on

Recommended Stories