चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी दुर्मीळ दृश्य पाहायला मिळाले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने निकाल "ड्रॉ" म्हणून मान्य करण्यासाठी पारंपरिक हस्तांदोलनाची ऑफर दिली. परंतु भारतीय फलंदाज रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी ती नम्रपणे नाकारली.
तेव्हा भारत १३८ षटकांत ३८६/४ अशा स्थितीत होता आणि ७५ धावांची आघाडी गाठली होती. सामना जवळपास निष्प्रभ अवस्थेत असताना इंग्लंडचे गोलंदाज थकलेले दिसत होते. पुढील कसोटी अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असल्याने, स्टोक्सने विश्रांतीच्या वेळेत भारतीय फलंदाजांकडे जाऊन सामन्याचा शेवट करण्यासाठी हात पुढे केला.
25
पुढे फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला
मात्र जडेजा (८९*) आणि सुंदर (८०*) या दोघांनीही वैयक्तिक शतकाच्या उंबरठ्यावर असल्याने, त्यांनी पुढे फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने ०/२ अशा धोकादायक स्थितीपासून सावरत पूर्ण वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे भारताच्या दोन अष्टपैलू फलंदाजांना पुढे खेळण्यात काही गैर वाटले नाही.
35
शांतपणे माघारी फिरत डोके हलवले
स्टोक्सचा चेहरा त्या क्षणी गोंधळलेला दिसत होता. त्याने शांतपणे माघारी फिरत डोके हलवले. त्याला राग आलेला नव्हता, मात्र तो थोडा अस्वस्थ आणि आश्चर्यचकित झाला होता.
ड्रिंक्स ब्रेक लगेचच जाहीर करण्यात आला, पण त्या क्षणापर्यंत या घटनेनेच सामना गाजवला. क्रिकेट हा खेळ "खेलभावनेचा" समजला जातो, आणि भारताचा निर्णय ही खेळ भावना मोडणारा नव्हता, तर तो आत्मविश्वास दाखवणारा होता. वैयक्तिक स्कोअर, संघाचा आत्मसन्मान आणि पुढच्या कसोटीसाठी इंग्लंडला थकवणे हे भारताचे उद्दिष्ट स्पष्ट होते.
55
गरजांमधील साधला समतोल
शेवटी, स्टोक्सचे हस्तांदोलन काही काळ थांबले. पण या प्रसंगाने कसोटी क्रिकेटमध्ये वैयक्तिक आणि संघाच्या गरजांमधील समतोलाचा एक वेगळा पैलू उलगडला.