Haris Rauf: हरिस रौफला मैदानावरची ती कृती पडली महागात, दंडाचा आकडा पाहून येईल चक्कर

Published : Sep 26, 2025, 06:52 PM IST
Haris Rauf

सार

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हरिस रौफने मैदानावर चिथावणीखोर हावभाव केले होते. या घटनेची सुनावणी झाल्यानंतर, रौफवर त्याच्या सामन्याच्या ३० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर साहिबजादा फरहानला इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळताना प्रेखसकांच्या हृदयाची धडकन वाढलेली असते. दुसऱ्या देशाचा खेळाडू बाद झाल्यावर समोरील देशातील प्रेक्षक आनंद साजरा करतात. २१ सप्टेंबर रोजी या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने मैदानावर चिथावणीखोर हावभाव केले होते.

त्याने हावभाव कसे केले होते? 

रौफने केलेल्या हावभावामुळे भारतात प्रेक्षकांनी टीका केली होती. शुक्रवारी या घटनेची सुनावणी झाल्यानंतर रौफवर कारवाई करण्यात आली. त्याला त्याच्या सामन्याच्या ३० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर, साहिबजादा फरहानला इशारा देऊन सोडून देण्यात आले. दोघांनी केलेल्या कृतीचा निषेध करण्यात आला असून ती खेळाच्या विरोधातील कृती मानण्यात आली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Beautiful women : चंद्राला लाजवणारे सौंदर्य, या 5 क्रिकेटपटूंच्या सुंदर पत्नी...
T20 रँकिंग : सूर्यकुमार यादव TOP 10 बाहेर, संजू सॅमसन-बुमराहला फायदा