Glenn Maxwell Retirement : 'द बिग शो'चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, मॅक्सवेलच्या निवृत्तीचं खरं कारण काय?

Published : Nov 03, 2026, 09:11 AM IST

Glenn Maxwell: ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह फर्स्ट क्लास आणि लिस्ट-ए क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने हा धक्कादायक निर्णय का घेतला? यामागचं नेमकं कारण काय?

PREV
16
अष्टपैलू प्रवासाचा शेवट

ऑस्ट्रेलियाचा फायरब्रँड अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांना धक्का दिला आहे. त्याने फक्त आंतरराष्ट्रीय सामनेच नाही, तर व्हिक्टोरियासाठी खेळल्या जाणाऱ्या फर्स्ट क्लास आणि ५० षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटलाही रामराम ठोकला आहे. ३८ वर्षीय मॅक्सवेलने 'द फायनल वर्ड' पॉडकास्टमध्ये ही अधिकृत घोषणा केली.

26
१४ वर्षांची कारकीर्द आणि भन्नाट रेकॉर्ड्स

२०१२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. त्याने १४ वर्षे क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं. ऑस्ट्रेलियासाठी त्याने १४९ वनडे, १३० टी-२० आणि ७ कसोटी सामने खेळले. वनडेत ३,९९० तर टी-२० मध्ये २,८९७ धावा त्याने कुटल्या. टी-२० मध्ये ५ शतके ठोकत त्याने रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली. गोलंदाजीतही कमाल करत त्याने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये १२८ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या.

36
२०२३ वर्ल्ड कपमधील 'ऑल टाईम बेस्ट' खेळी

२०१५ आणि २०२३ चा वनडे वर्ल्ड कप, तसेच २०२१ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात मॅक्सवेलने महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः २०२३ च्या वर्ल्ड कपमध्ये वानखेडे स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने खेळलेली २०१ धावांची नाबाद खेळी क्रिकेटच्या इतिहासातील एक चमत्कार आहे. पायात भयंकर गोळे आलेले असतानाही त्याने एका पायावर उभं राहून ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला.

46
एमसीजीवरील फेअरवेल हुकलं

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून निरोप घेण्याची मॅक्सवेलची इच्छा होती. पण निवड समितीने युवा खेळाडूंना प्राधान्य दिल्याने त्याला ही संधी मिळाली नाही. फेब्रुवारी २०२६ मध्ये ओमानविरुद्ध खेळलेला टी-२० सामनाच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय आपल्याला पूर्णपणे मान्य असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

56
आता फक्त लीग क्रिकेटवर फोकस

फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि कारकिर्दीत उरलेल्या लीग सामन्यांवर फोकस करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचं मॅक्सवेलने सांगितलं. २०२७-२८ च्या सीझनपर्यंत तो बिग बॅश लीगमध्ये (BBL) मेलबर्न स्टार्सकडून खेळताना दिसेल. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आणि रिहॅबनंतर तो पुन्हा पूर्ण फिटनेससह लीग सामन्यांमध्ये धुमाकूळ घालणार आहे.

66
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं नेमकं कारण काय?
  • फिटनेसवर लक्ष: ३८ व्या वर्षी शरीराची काळजी घेण्यासाठी आणि गुडघेदुखीतून सावरण्यासाठी तो वेळ देणार आहे.
  • निवड समितीचा भविष्याकडे कल: २०२८ चे ऑलिम्पिक आणि आगामी स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियन बोर्डाने युवा खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट गमावणे: क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२६-२७ च्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून त्याला वगळले.
  • संधी कमी होणे: मे-जून २०२६ मधील बांगलादेश दौरा आणि इंग्लंड सीरिजसाठीही निवड समितीने त्याला डावलले.
  • याच कारणांमुळे त्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटला रामराम ठोकला. पण तो बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळत राहील.

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Photos on

Recommended Stories