Dinesh Karthik : दिनेश कार्तिक पुन्हा एकदा बाबा; सोशल मीडियावर दिली खुशखबर

Published : Mar 19, 2026, 01:25 PM IST
Dinesh Karthik

सार

Dinesh Karthik : भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि त्यांची पत्नी दीपिका पल्लीकल यांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला आहे. ‘राहा’ असे नाव ठेवलेल्या या गोंडस परीमुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

Dinesh Karthik : भारतीय क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक यांनी आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आयपीएल 2026 हंगामाच्या आधीच त्यांच्या घरी गोड परीचे आगमन झाले आहे. कार्तिक आणि त्यांची पत्नी दीपिका पल्लीकल (Dipika Pallikal) यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

‘राहा’च्या आगमनाने कुटुंबात आनंद

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून त्यांनी तिचे ‘राहा’ असे नाव ठेवले आहे. या नव्या सदस्याच्या आगमनामुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी 2021 मध्ये या दाम्पत्याला जुळी मुले झाली होती, ज्यांची नावे जियान आणि कबीर अशी आहेत.

लग्न आणि वैयक्तिक आयुष्य

कार्तिक आणि दीपिका यांचा 2013 मध्ये साखरपुडा झाला होता, तर 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू दोन्ही परंपरांनुसार विवाह सोहळा पार पाडला. दीपिका ही भारताची प्रसिद्ध स्क्वॉश खेळाडू असून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

आयपीएलनंतर नवी भूमिका

दिनेश कार्तिक यांनी आयपीएल 2024 नंतर क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सध्या तो रॉयल चॅलेंजर्स बंग्लोर (Royal Challengers Bangalore) च्या कोचिंग स्टाफमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.

आयुष्यातील कठीण काळावर मात

दिनेश कार्तिकच्या आयुष्यात एक कठीण टप्पाही आला होता. त्यांचे पहिले लग्न निकिता वंजारा यांच्यासोबत झाले होते. मात्र नंतर वैयक्तिक कारणांमुळे 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्या काळात ते मानसिकदृष्ट्या खचले होते आणि डिप्रेशनमध्ये गेले होते. यानंतर दीपिका पल्लीकल त्यांच्या आयुष्यात आल्या आणि त्यांनी कार्तिकला नव्याने उभारी दिली. आज ते पुन्हा एकदा आनंदी कुटुंबासह आयुष्याचा नवा टप्पा साजरा करत आहेत.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Abhishek Sharma: अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी, २००० टी-२० धावांचा टप्पा पार
New Zealand Squad: रचिन रवींद्र परतला; भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी न्यूझीलंडची दोन वेगळी पथके