Cricket Online Betting Scam : युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैनाची ED चौकशी

Published : Jun 18, 2025, 10:40 AM ISTUpdated : Jun 18, 2025, 11:18 AM IST
ED

सार

भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांची ऑनलाइन सट्टेबाजी कंपनीच्या जाहिरातींमध्ये सहभागी झाल्याबद्दल ईडी चौकशी. या प्रकरणात हजारो कोटींचा सट्टा खेळल्याचा आरोप असून, खेळाडूंना मोठी रक्कम दिल्याचे वृत्त आहे.

क्रिकेट म्हणजे केवळ खेळ नाही तर भारतीय जनतेसाठी श्रद्धेचा विषय आहे. मात्र या श्रद्धेच्या मैदानावर आता संशयाचे ढग गडद होत चालले आहेत. देशातील मोठ्या ऑनलाइन सट्टेबाजी कंपनीची जाहिरात केल्यामुळं भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केल्याची माहिती उघड झाली आहे.

या तिघांनाही 1XBET या वादग्रस्त प्लॅटफॉर्मशी संबंधित जाहिरातींमध्ये सहभागी झाल्याबद्दल चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ED च्या माहितीनुसार, या अ‍ॅपच्या माध्यमातून हजारो कोटींचा सट्टा खेळला गेला असून, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते खेळाडूंना ‘ब्रँड प्रमोशन’, इव्हेंटमध्ये हजेरी व सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली होती.

क्रिकेट, पैसा आणि सट्टा – गोंधळलेली सीमारेषा

क्रिकेट हा भारतात फक्त खेळ नसून त्याला भक्तीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या खेळाच्या प्रतिमेला धक्का लागेल असे कोणतेही कृत्य जनतेत तीव्र राग निर्माण करत असते. युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना – हे तिघेही देशासाठी ICC स्पर्धांमध्ये मोलाचा वाटा उचललेले खेळाडू आहेत.

त्यांच्यावर कोणतीही थेट गैरप्रकाराची कारवाई सध्या झाली नसली तरी अशा तपासांमध्ये त्यांची नावे येणे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे. हे खेळाडू आपली बाजू स्पष्ट करताना म्हणाले की, “आम्ही फक्त या कंपनीच्या जाहिरातीमध्ये सहभाग घेतला आहे.”

मात्र प्रश्न राहतो तो नैतिकतेचा 

 प्रसिद्ध व्यक्तींनी कोणत्या संस्थेशी आपला संबंध जोडावा हे निवडताना जाणीवपूर्वक जबाबदारी घ्यायला हवी, कारण त्यांचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असतो. प्रकरणावर विविध क्षेत्रांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी "सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे," असा सूर आळवला आहे. राजकीय स्तरावरून या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांशी असलेला संबंध अधोरेखित करत केंद्र सरकारने यावर अधिक कठोर कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

कोणत्या खेळाडूंचा समावेश?

भारतीय अंमलबजावणी संचालनालयाने अवैध ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्स–जसे 1xBet, FairPlay, Parimatch, Lotus365 आणि Mahadev Online Book–च्या जाहिरातींमध्ये काही माजी क्रिकेटपटूंनी सहभाग घेतल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे क्रिकेटपट्टूची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

हरभजन सिंग - 1xBet, FairPlay आणि Parimatch सारख्या बेटिंग प्लॅटफॉर्म्ससाठी जाहिरातीत सहभागी झाला. यामध्ये त्याने सोशल मिडिया व्हिडिओ, इव्हेंट्समध्ये ब्रँड प्रमोशन आणि जाहिरात पोस्टर्समध्ये हजेरी लावली. त्यामधून त्याला चांगले पैसे मिळाले असल्याचं सांगण्यात आलं. ED ने हरभजन चौकशीसाठी बोलावलं; ही चौकशी त्यानं केलेल्या जाहिरातींबाबत झाली.

युवराज सिंग - 1xBet आणि Mahadev Online Book सारख्या अ‍ॅप्सच्या ब्रँड अँबेसिडरच्या स्वरूपात जाहिरातींमध्ये युवराज सिंग सामील झाला होता. त्याची ईडी चौकशी झाली आहे. 

सुरेश रैना - FairPlay, Lotus365 आणि Parimatchमध्ये जाहिरातींमध्ये सुरेश रैनाने हजेरी लावली; सोशल मिडियावर शेअर्स आणि प्रमोशनल कॉन्टेंट शेअर केला आहे. अनेक क्रिकेट खेळाडूंनी ड्रीम इलेव्हन सारख्या कंपनीसाठी जाहिरात केल्या असून त्यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. आयपीएल या क्रिकेट खेळातील लीगला ड्रीम इलेव्हनने मोठी स्पॉन्सरशिप दिली होती. या प्लॅटफॉर्मवर जवळपास कोट्यवधी लोक जुगार खेळतात असं लक्षात आलं आहे.

ड्रीम इलेव्हनच्या जाहिरातीत कोण होत सहभागी? 

ड्रीम 11 या फॅन्टसी क्रिकेट अ‍ॅपची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय क्रिकेटपटूंनीही सहभाग घेतला आहे. सर्वात आधी महेंद्रसिंह धोनी यांनी “ड्रिम 11” चा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर म्हणून प्रचार केला होता. त्यानंतर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शिखर धवन, के.एल. राहुल, संजू सॅमसन यांसारख्या स्टार खेळाडूंनी विविध जाहिरातींमध्ये सहभाग घेतला.

या जाहिराती ‘Dimaag Se Dhoni’, ‘Champions Ka Game’, आणि ‘Team Se Bada Kuch Nahi’ अशा मोहिमांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या. आयपीएल दरम्यान या जाहिरातींना विशेष प्रसिद्धी मिळाली आणि खेळाडूंनी त्यांच्या क्रिकेट कौशल्यापेक्षा जाहिरात क्षेत्रातही प्रेक्षकांवर छाप पाडली. रणबीर कपूर, आमिर खान यांसारख्या कलाकारांसोबतही खेळाडूंनी या जाहिरात मोहिमांमध्ये सहभाग घेतला.

ड्रीम 11 सारख्या अ‍ॅप्सच्या जाहिराती करणे कितपत योग्य आहे, यावर सध्या सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू आहे. तरीही खेळाडूंनी या क्षेत्रात सहभाग घेतल्याने त्यांच्या जबाबदारीबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. अशा जाहिरातींचा समाजावर आणि युवकांवर काय परिणाम होतो, यावर सरकार आणि संबंधित संस्थांनी आता अधिक स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Jasprit Bumrah Birthday : वार्षीक कमाई, एकूण संपत्ती, महागड्या कार, आलिशान घर आणि लक्झरी लाईफस्टाईल
मुंबईच्या पराभवानंतर रोहितचा मोठा निर्णय, मुश्ताक अली T20 क्रिकेटमध्ये परतणार!