
हैदराबाद - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदरने त्यांच्या लग्नाबाबत पसरत असलेल्या अफवा फेटाळल्या आहेत. सन ग्रुपचे अध्यक्ष कलाणिधी मारन यांची मुलगी काव्या मारन हिच्याशी अनिरुद्धचे लग्न होणार असल्याची चर्चा इंटरनेटवर जोरदारपणे सुरू होती. मात्र, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे अनिरुद्धने स्वतः स्पष्ट केले आहे.
या गॉसिपचा उगम रेडिटवरील एका पोस्टमधून झाला. या पोस्टमध्ये अनिरुद्ध आणि काव्या मारन गेल्या वर्षभरापासून प्रेमात असल्याचे, कुटुंबांमध्ये लग्नाच्या चर्चा झाल्याचे आणि रजनीकांतही या प्रकरणात सहभागी असल्याचे म्हटले होते. तसेच अनिरुद्ध आणि काव्या लास वेगाससह अनेक ठिकाणी सुट्ट्या घालवताना दिसले, अशाही अफवा पसरल्या होत्या. अफवा वाढत असताना अनिरुद्धने प्रतिक्रिया दिली.
त्यांच्या X खात्यावर.. काय लग्न ? शांत राहा मित्रांनो, खोट्या बातम्या पसरवू नका असे लिहिले. त्यामुळे या बातम्यांना पूर्णविराम मिळाला.
अनिरुद्धने आधीच अनेक वेळा सांगितले आहे की ते सिंगल आहेत आणि लवकरच लग्न करण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही. ते सध्या रजनीकांत, कमल हासन, दलपती विजय, शाहरुख खान यांसारख्या स्टार्सच्या चित्रपटांना संगीत देण्यात व्यस्त आहेत.
काव्या मारनही सनरायझर्स हैदराबाद संघ आणि सन ग्रुपच्या कामात पूर्णपणे व्यस्त आहेत. काव्या मारन आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबाद संघामुळे प्रसिद्ध आहेत.