राहुल द्रविडच्या रिप्लेसमेंटची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, सोशल मीडियावर निर्णय केला जाहीर

Published : Aug 24, 2025, 04:51 PM IST

भारतीय कसोटी संघाचा भक्कम फलंदाज चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. राहुल द्रविड याच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराने त्याची जागा टिकवून ठेवली होती. त्यामुळे त्याला भारतीय संघाची वॉल म्हटले जायचे.

PREV
15
पुजाराची निवृत्ती
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय जर्सी घालणे, राष्ट्रगीत ऐकणे हे सगळं खूप भावनिक असल्याचं त्याने म्हटलं आहे.
25
भारतीय संघात खेळण्याचं स्वप्न पूर्ण

३७ वर्षीय पुजाराने एक्स वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'राजकोटमधल्या एका लहान मुलाने आपल्या पालकांसोबत मोठं स्वप्न पाहिलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचा भाग व्हायचं होतं. क्रिकेटमुळे मला एवढे मोठे अनुभव मिळतील असं वाटलं नव्हतं. माझ्या राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

35
सर्व चाहत्यांचे आभार

मी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. माझ्या कारकिर्दीत मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल बीसीसीआय आणि सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आभार. माझ्या संघ सहकाऱ्यांना, सपोर्ट स्टाफ, मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांना धन्यवाद.'

45
कसोटी क्रिकेटचा भक्कम फलंदाज

राहुल द्रविडनंतर भारतीय कसोटी संघाचा भक्कम फलंदाज म्हणून पुजाराला ओळखलं जात होतं. त्याच्या संयमी खेळीमुळे तो अनेकदा संघाला जिंकून दिला आहे. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी पुजाराने ५२१ धावा केल्या होत्या.

55
कसोटीत किती धावा?

पुजाराने १०३ कसोटी सामन्यांमध्ये ७,१९५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १९ शतके आणि ३५ अर्धशतके आहेत. २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात त्याने शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं.

वयामुळे त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर तो कॉमेंट्री करणार आहे. द्रविडनंतर पुजाराने त्या जागा भरून काढली होती. पण आता पुजाराची जागा भरून काढणं अवघड आहे.

Read more Photos on

Recommended Stories