Amol Muzumdar The Unsung Hero : या प्रशिक्षकाला एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव नाही. टीम इंडियाकडून खेळण्याचं त्यांचं स्वप्न होतं, पण ते पूर्ण झालं नाही. मात्र, आता त्यांनी वर्ल्ड कप जिंकला आहे.
नवी मुंबईत झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करत हरमनप्रीतच्या संघाने स्वप्नवत कप जिंकला.
25
जगभरात विजयाचा जल्लोष
टीम इंडियाच्या विजयानंतर जगभरात जल्लोष साजरा झाला. पंतप्रधान मोदींनी महिला संघाचे अभिनंदन केले. हा विजय भविष्यातील चॅम्पियन्ससाठी प्रेरणादायी ठरेल, असे ते म्हणाले.
35
प्रशिक्षकाची महत्त्वाची भूमिका
अमोल मुझुमदार हे नाव भारतीय महिला क्रिकेट इतिहासात कायम राहील. प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
अमोल मुझुमदार यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मुंबईच्या या डोमेस्टिक स्टारला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी प्रशिक्षक म्हणून स्वप्न पूर्ण केले.
55
मुझुमदार यांची कारकीर्द
मुझुमदार यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७१ सामन्यांत ११,१६७ धावा केल्या आहेत. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ११३ सामन्यांत ३,२८६ धावा केल्या आहेत.