कल्याणमध्ये अनोळखी तरुणी लिफ्टने १७ व्या मजल्यावर गेली, तेथून मारली खाली उडी

Published : May 04, 2025, 12:42 PM ISTUpdated : May 04, 2025, 12:50 PM IST
sucide

सार

कल्याणच्या योगिधाम परिसरात एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेने १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सदर महिला योगिधाममधील रहिवासी नसून ती बाहेरून आली होती आणि थेट लिफ्टने १७ व्या मजल्यावर जाऊन उडी मारली.

कल्याण | प्रतिनिधी - कल्याणच्या योगिधाम परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. एका ३५ वर्षीय अनोळखी महिलेने उंच इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलेच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला योगिधाममधील रहिवासी नसून ती बाहेरून आली होती. ती थेट लिफ्टने १७व्या मजल्यावर गेली आणि काही क्षणांतच इमारतीवरून खाली उडी घेतली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.

घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि अधिक तपास सुरू केला. पोलिसांनी महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला असून, ती कोण होती, कुठून आली होती आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं – याचा शोध घेतला जात आहे. योगिधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले, “दुपारच्या सुमारास फोन आला आणि घटनास्थळी गेल्यावर समजले की एका अनोळखी महिलेने आत्महत्या केली आहे. ती या सोसायटीतील रहिवासी नव्हती, ती बाहेरूनच आली होती.”

सदर प्रकारामुळे समाजात मानसिक आरोग्याविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाढता तणाव, एकटेपणा आणि भावनिक अस्थैर्य यावर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!