मुंबईतील एका डीमार्ट स्टोअरमध्ये मराठी भाषेच्या वापरावरून वाद निर्माण झाला. या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि माफी मागायला लावली.
मनसे सैनिकांनी कर्मचाऱ्याला काढलं झोडपून, थोबाडीत मारताना व्हिडीओ झाला व्हायरल
मुंबईतील डीमार्ट स्टोररमध्ये मराठीवरून वाद झाला. या वादामध्ये मनसे सैनिकांनी उडी घेतली असून त्यांनी तेथील बॉससोबत अरेरावीची भाषा केली. यावेळी त्या कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याच दिसून आलं आहे.
25
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विचारला जाब
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित बॉसला जाब विचारला. मराठी हि महाराष्ट्रातील भाषा असून हि बोलण्याचा सन्मान द्या अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
35
स्टोअर कर्मचाऱ्याला मारली झापड
यावेळी डीमार्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी झापड मारली. त्यानंतर त्याला माफी मागायला भाग पाडल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या घडलेल्या घटनेवर मनसेने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, महाराष्ट्रात मराठी भाषेला सन्मान द्यायला हवा. या घटनेबद्दल सोशल माध्यमांवर चर्चा सुरु झाली आहे.
55
महाराष्ट्रात मराठी भाषेचा प्रश्न झाला तयार
महाराष्ट्रात आता मराठी भाषेचा प्रश्न तयार झाला आहे. बाहेरून आलेल्या कामगार आणि लोकांना मराठी भाषा येत नसेल तर त्यांना दरवेळी मारहाण होणार का असं समाजमाध्यमांमधून लोकांनी विचारलं आहे.