कबुतरांनी माझ्या आईचा जीव घेतला, आमदार राम कदम असं का म्हणाले?

Published : Jul 07, 2026, 10:15 PM IST
BJP MLA Ram Kadam

सार

आमदार राम कदम यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतरची दुःखद कहाणी सांगितली आहे. त्यांच्या आईचे १२ जून रोजी फुफ्फुसाच्या गंभीर आजारामुळे निधन झाले, ज्यावर जगात कोणताही इलाज नाही. कदम यांनी त्यांच्या आईला शेवटच्या क्षणी झालेल्या असह्य वेदना आणि मरणयातनांबद्दल भाष्य केले.

मुंबई: सध्याच्या घडीला राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मुंबईतील दादर येथे असलेल्या कबुतरखान्याचा प्रश्न अडकला होता. त्या कबुतरांमुळे आजार होत होते असं अनेकजण म्हणत होते. त्यातच नंतर कबुतरखाना बंद केल्यामुळं जैन धर्मियांनी आंदोलन केलं होत. आता आमदार राम कदम यांनी या कबुतरखान्यावरून आपलं मत मांडलं आहे.

राम कदम काय म्हणाले? 

राम कदम यांनी यावेळी बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. राम कदम बोलले की, ज्या आईने मला जन्म दिला तिचे १२ जून रोजी निधन झाले. माझ्या आईच्या बाबतीत शेवटच्या क्षणी जे झालं ते कोणाच्या बाबतीत होऊ नये. माझ्या आईने आयुष्यभर नामस्मरण केलं. तिला तिच्या शेवटच्या क्षणी मरण यातना सहन कराव्या लागल्या.

माझ्या आईला फुप्फुसाचा आजार झाला होता 

माझ्या आईला फुफ्फुसाचा आजार झाला होता. या आजाराला संपूर्ण जगात कोणतही औषध नाही. हा आजार झालेल्या रुग्णाला २४ तास ऑक्सिजन लागतो. पण हा आजरा वाढत गेल्यानंतर फुफ्फुसात वेदना होत होत्या. माझी आई पंधरा मिनिटे सलग खोकत होती. खोकता खोकता ती बेशुद्ध व्हायची. भारतात दर वर्षी नऊ लाख रुग्ण या आजाराला बळी पडतात.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार? पंतप्रधानांच्या आर्थित सल्लागार कमिटीकडून महत्त्वाचा सल्ला
Blood Circulation : पालक खा, असा रक्तप्रवाह सुधारा?ब्लड सर्क्युलेशनच्या 5 गोष्टी