Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये मिळणार? पंतप्रधानांच्या आर्थित सल्लागार कमिटीकडून महत्त्वाचा सल्ला

Published : Jul 07, 2026, 06:58 PM IST
Ladki Bahin Yojana

सार

Ladki Bahin Yojana Money : लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये मिळतात, मात्र हे पैसे २१०० रुपये करण्याचा सल्ला पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार कमिटीकडून देण्यात आला आहे. 

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये दिले जातात. मात्र ज्यावेळी ही योजना सुरू करण्यात आली त्यावेळी महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देण्याचं सांगण्यात आलं होतं. पण ही रक्कम न देता आता १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बाब समोर आली आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार?

पंतप्रधानांच्या आर्थित सल्लागार परिषदेने एक रिसर्च पेपर सादर केला. यात त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याची मागणी केली आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुटुंबाच्या खर्चात वाढ होते, या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडली तर ही १५०० रुपयांची रक्कम २१०० रुपयांपर्यंत वाढवावी, असं पंतप्रधानांच्या आर्थित सल्लागार परिषदेने सूचवलं आहे.

संपूर्ण कुटुंबाला लाडकी बहीण योजनेचा फायदा

पंतप्रधानांच्या आर्थित सल्लागार परिषदेने रिसर्च पेपर सादर करत अनेक गोष्टींची माहिती दिली. ओडिशातील सुभद्रा योजना आणि महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा त्यांनी अभ्यास केला. या योजनामुळे महिलांच्या बचतीत वाढ झाली, त्यांच्या घरातील खर्चात हातभार लावता येऊ लागला. तसंच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीदेखील सुधारण्यास मदत झाली. महिलांना या रोख मदतीचा वापर आरोग्य, शिक्षण, दररोजच्या गरजांसाठी करतात, त्यामुळे या योजनेचा कुटुंबातील सर्वांना फायदा झाल्याचं, रिसर्च पेपरमध्ये सांगण्यात आलं आहे.

या सर्व अभ्यासानंतर पंतप्रधानांच्या आर्थित सल्लागार परिषदेने सादर केलेल्या रिसर्च पेपरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. अनेक अपात्र महिलांच्या खात्यात १५०० जमा झाले. मात्र त्यानंतर सरकारने अपात्र महिलांना या योजनेतून वगळलं. जवळपास ८० लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरल्या. अपात्र ठरलेल्या महिलांचे १५०० रुपये बंद झाले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Blood Circulation : पालक खा, असा रक्तप्रवाह सुधारा?ब्लड सर्क्युलेशनच्या 5 गोष्टी
Recharge Plans: एअरटेलचा ₹548 की जिओचा ₹448 प्लॅन? तुमच्यासाठी कोणता बेस्ट