
मुंबई: राज्यात नीट पेपरफुटीनंतर वातावरण चांगलंच पेटलं होतं. आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळातील वातावरण बदलत चाललं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राज आणि उद्धव दोघांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपला देश अस्वस्थ आहे आणि त्याच कारण आपल्याला माहित आहे. मला अभिजित दीपके आणि देशातील तरुणांचं कौतुक आहे. त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या वडिलांचं खासकरून अभिनंदन करतो. देशातील जनतेवर काही न काही दबाव टाकला जात आहे. एका झुरळानेच या सरकारला वाकवल्याचं ठाकरेंनी सांगितलं.
पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. अभिजीतला फोन लावतोय पण लागत नाही. त्या आजूबाजूच्या परिसराला जॅमर लागलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शिवसेना आणि मनसे मिळून मोर्चा काढणार होते. पण त्याआधीच दोघांचा राजीनामा झाला आहे. उद्या मोर्चा होणार असल्याचं यावेळी ठाकरे यांनी म्हटलं आहे.