
मुंबई: डोंबिवली येथे एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टरला मारहाण केली. यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधारी गटावर टीका केली. त्यानंतर या नगरसेवकाला पोलिसांनी तात्काळ अटक केली. नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि नर्स दोघांना मारहाण केली होती.
डॉक्टरांना जर लोकप्रतिनिधी मारहाण करायला लागले तर त्यांनी काम कस करायचं, हा प्रश्न विरोधकांनी विधिमंडळात विचारला. त्यानंतर विष्णू नगर पोलिसांनी नगरसेवकाला अटक केली. त्यानंतर कल्याण कोर्टात अटक केल्यावर त्यांनी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेश पवार, अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम यांना पोलीस कोठडी मिळाली.
तिघांवर सरकारी कामकाजात अडथळा, डॉक्टरांना जीवे मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारची कलमे लावली. अटक करण्यात आलेल्या या तिघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांमध्ये नगरसेवक रमेश म्हात्रेचा समावेश आहे. या हॉस्पिटलच्या बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणात विधिमंडळात आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला. यावेळी रोहित पवार आणि विनायक राऊत यांनी हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांची बाजू समजून घेतली.
डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिला रुग्णाच्या नवजात बाळाला NICU बेडची गरज होती. यावेळी हॉस्पिटल पूर्ण भरलेलं असल्यामुळं डॉक्टरांनी त्यांना दुसरीकडं हलवायला सांगितलं. यावेळी डॉक्टरांशी नातेवाईक आणि आरोपी यांनी भांडण केलं. त्यानंतर यावेळी रेकॉर्ड झालेला सीसीटीव्हीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.