३४ वर्षांनी शरद पवार यांनी विधानभवनाला दिली भेट, काय होतं कारण?

Published : Jul 08, 2026, 06:17 PM IST
Sharad Pawar

सार

शरद पवार यांनी तब्बल ३४ वर्षांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी विधानभवनात झालेल्या बैठकीला हजेरी लावली. बेळगाव प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात लवकरच होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते.

मुंबई: महाराष्ट्रात शरद पवार हे नाव कायम चर्चेत येत असत. राजकारण म्हटलं की त्यांचं नाव लोकांच्या तोंडात येतं. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी होणाऱ्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली. त्यांनी जवळपास ३४ वर्षांनी विधानभवनात हजेरी लावली. या बैठकीकडं संपूर्ण देशवासीयांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. लवकरच बेळगाव प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी येणार आहे. यामुळं हि बैठक आयोजित करण्यात आली.

बैठकीला कोण राहणार उपस्थित 

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, खासदार शरद पवार, नारायण राणे उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. यावेळी हि बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार पडली. यावेळी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते.

पक्षाचे सर्व नेते होते उपस्थित

यावेळी पक्षाचे सर्व नेते उपस्थित असल्याचं दिसून आलं. यावेळी विधानभवनात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. ३४ वर्षानंतर विधानभवनात बेळगाव प्रश्नी बैठकीला शरद पवार यांनी हजेरी लावली. बेळगावप्रश्नी कायमच तेथील नागरिकांकडून आवाज उठवला जातो. बेळगावचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा अशी त्यांची मागणी राहिली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या लग्नाची गोष्ट | असं काय पाहिलं मुंढेंमध्ये?
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची झाली की, त्यांचा मुलगा विचारतो, मी पण