मध्य रेल्वेवरील ठाणे हे सर्वात गजबजलेले स्थानक मानले जाते. येथे दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. ट्रान्स हार्बर मार्ग आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे या स्थानकावर प्रचंड ताण येतो. नव्या स्थानकामुळे होणारे फायदे
गर्दीचे विभाजन: ठाणे आणि मुलुंड स्थानकांवरील प्रवाशांची संख्या विभागली जाईल.
प्रवास सुखकर: पीक अवर्समध्ये लोकलमध्ये चढण्यासाठी होणारी कसरत कमी होईल.
कनेक्टिव्हिटी: ठाणे शहर आणि ग्रामीण भागातील २५ लाखांहून अधिक लोकसंख्येला या सुविधेचा थेट लाभ मिळेल.