मुंबईतील ठाकरे गटाला जबर धक्का, तेजस्वी घोसाळकरांचा राजीनामा, शिंदे गटात प्रवेशाची शक्यता

Published : May 13, 2025, 01:40 PM ISTUpdated : May 13, 2025, 01:41 PM IST

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटासाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला. ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या नेत्या आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे. 

PREV
15

राजीनाम्यामागचे कारण: स्थानिक नेतृत्वावर नाराजी

तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या राजीनाम्यात "वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे" असे नमूद केले असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी अनेक वेळा विभागप्रमुख व संघटकांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तरीही पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे त्यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने उत्तर मुंबईत ठाकरे गटाची पकड सैलावण्याची शक्यता आहे.

25

अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि त्यानंतरचा तणाव

यावर्षीच्या सुरुवातीस, तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरीस नरोन्हा या व्यक्तीने गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेमुळे घोसाळकर कुटुंब चर्चेत आले. अभिषेक यांचे वडील आणि तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत आणि ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध आहेत.

35

राजकीय घडामोडी: भाजप किंवा शिंदे गटात प्रवेशाची शक्यता?

राजीनाम्यानंतर तेजस्वी घोसाळकर भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, काही वरिष्ठ नेते त्यांची "मनधरणी" करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, घोसाळकर कुटुंबाची ठाकरे घराण्याशी जवळीक असली, तरी स्थानिक पातळीवरील व्यवस्थापनामुळे असंतोष वाढल्याचे दिसत आहे.

45

तेजस्वी घोसाळकरांना जीवे मारण्याची धमकी

गेल्या महिन्यात तेजस्वी घोसाळकर यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. “लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद” असा मजकूर व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे त्यांच्याभोवतीचा तणाव अधिक वाढला होता.

55

मातोश्रीकडून डॅमेज कंट्रोल सुरू

राजीनाम्यानंतर मातोश्रीवरून तातडीने तेजस्वी घोसाळकर यांना बोलावण्यात आले असून, वरिष्ठ नेते या संपूर्ण घडामोडीची माहिती घेत आहेत. मात्र, त्यांच्या पक्षत्यागाने ठाकरे गटाला मुंबईतील मजबूत भागात मोठी सेंध लागण्याची शक्यता आहे.

Recommended Stories