गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत रात्रभर विशेष BEST बस सेवेची सोय

Special BEST Bus during Ganpati : मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बेस्टने रात्रभर विशेश बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Special BEST Bus during Ganpati : मुंबईत गणेशोत्सवाची मोठी धूम पहायला मिळते. मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांना भेट देण्यासाठी दूरवरुन भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. अशातच भाविकांचा दर्शनावेळचा प्रवास सुखकर होण्यासाठी बेस्ट बसने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादम्यान बेस्ट बसच्या माध्यमातून रात्रभर मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळांपर्यंत भाविकांना पोहोचवण्याची सोय केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून बेस्टकडून गणेशोत्सवादरम्यान विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदा 7 सप्टेंबर पासून ते 16 सप्टेंबर पर्यंत बेस्ट बस रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. यामुळे भाविकांना मुंबईतील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.

बेस्ट बसचा मार्ग आणि क्रमांक
बेस्ट बसची गणेशोत्सवावेळी विशेष बस सेवा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरात चालवली जाणार आहे. यामुळे गणेशभक्तांना गिरगाव, लालबाग, परेल आणि चेंबूरसारख्या ठिकाणच्या गणपती मंडळांना भेट देता येईल. बेस्ट बस मार्गामध्ये 4 लिमिटेड, 7 लिमिटेड, A-21, A-25, A-42, 44,66, 69 आणि C-51 बसचा समावेश आहे. या विशेष बसच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुविधेनुसार त्या चालवण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.

रात्री उशिरापर्यंत धावणार मुंबई मेट्रो
गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील मेट्रो सेवाही रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार आहे. मेट्रो सेवा 11 सप्टेंबरपासून ते 17 सप्टेंबरदरम्यान, मेट्रो सेवेचा कालावधी वाढवला जाणार आहे. यादरम्यानस अंधेरी पश्चिम आणि गोंदवली मेट्रो स्थानकातून शेवटची मेट्रो 11 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आहे. यावेळी 20 अतिरिक्त मेट्रो चालवल्या जाणार आहेत.

सिडकोककडून मेट्रोच्या भाडे दरात कपात
सिडकोद्वारे बेलापुर ते पेंढारपर्यंत चालवल्या जाणाऱ्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या भाडे दरात 33 टक्के कपात करण्यात आली आहे. नवे दर 7 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याशिवाय मेट्रोचे भाडे कमीत कमी 10 रुपये आणि अधिकाधिक 30 रुपये असणार आहे.

मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा 
मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 50 किलोमीटर लांबीचा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. हा मार्ग नऊ प्रकल्पाअंतर्गत तयार होणार आहे. यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणाच्या 282 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

आणखी वाचा : 

Mumbai Fire : टाइम्स टॉवरला भीषण आग, घटनास्थळी 9 अग्निशमनच्या गाड्या दाखल

शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

Read more Articles on
Share this article