Rajpal Yadav : अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवासाची शिक्षा, ७ कोटींचा दंड ठोठावला; नेमकं प्रकरण काय?

Published : Jul 10, 2026, 05:51 PM IST
Rajpal Yadav Cheque Bounce Case

सार

Rajpal Yadav Cheque Bounce Case : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या जेलसह त्याला ७ कोटींहून अधिकचा दंडही ठोठवण्यात आला आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चेक बाऊंस प्रकरणी राजपाल यादवला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. जेलच्या शिक्षेसह त्याच्यावर कोर्टाने कोट्यवधींचा दंडही आकारला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राजपाल यादवने २०१० मध्ये 'अता पता लापता' हा सिनेमा तयार केला होता. सिनेमासाठी त्याने ५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. तो हे कर्ज फेडू शकला नाही. त्यामुळे कर्जावरचा बोजा वाढून कर्जाची रक्कम ९ कोटी झाली. दिल्ली न्यायालयाने ९ कोटींच्या चेक बाऊंस प्रकरणात थकीत रक्कम भरण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशी राजपाल यादवने विनंती केली होती, मात्र न्यायालयाने ही विनंती फेटाळली. त्यानंतर अभिनेत्याने कोणताच पर्याय नसल्याने ५ फेब्रुवारी २०२६ मध्ये तिहार जेलमध्ये जाण्याचं ठरवलं. या काळात त्याला सोनू सूदसह सलमान खान, मिका सिंह, अजय देवगन अनेकांनी मदत केली होती. १७ फेब्रुवारीला त्याला जामिन मिळाला. नंतर १८ मार्चपर्यंत त्याची शिक्षा स्थगित करत त्याला दिलासा मिळाला होता.

कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

आज १० जुलै रोजी शुक्रवारी याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाात सुनावणी झाली. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने सुनावणी दिली. या सुनावणीमध्ये कोर्टाने राजपाल यादवला दोषी ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. राजपाल यादव याने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या त्याच्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये त्याला शिक्षा देण्यात आली आहे.

जेलसह दंडाचीही शिक्षा

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात, राजपाल यादव चेक बाऊंसच्या प्रकरणात दोषी आढळला. त्यानंतर आता तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे न्यायालयाने राजपाल यादवला दिलेली ही शिक्षा त्याला एकाच वेळी भोगण्याचे आदेश दिले आहेत. म्हणूच त्याला कारागृहात तीन महिन्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.

तुरंगवासाच्या शिक्षेसह कोर्टाने अभिनेत्याला भरभक्कम दंडही ठोठावला आहे. कोर्टाने राजपाल यादवला १.५ कोटींचा दंड ठोठावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चेक बाऊंस प्रकरण केवळ नव्हतं, तर चेक बाऊंसच्या सात प्रकरणात त्याला दंड झाला आहे. त्यामुळे या सात प्रकरणांमुळे त्याला ७.५ कोटींचा दंड भरावा लागणार आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार, त्याला प्रत्येक प्रकरणात १,४,७५००० रुपये तक्रारदाराला आणि २५ हजार रुपये राज्यासाठी द्यावे लागणार आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ATS Action : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी मुंबईसह राज्यभरातून १५० लोक संपर्कात? ATS कडून कारवाई
मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा मनसेचा अजेंडा शोधा, भाजपा प्रवक्त्याने राज ठाकरे यांनी दिला टोला