महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड, छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

Published : Apr 30, 2025, 08:02 PM ISTUpdated : Apr 30, 2025, 08:04 PM IST
छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस

सार

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज (दि.३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.१) मुंबईच्या दौर्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमिवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाते, की त्यांचा भेट भाजपमध्ये प्रवेश होतो, हे बघण्यासारखे आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर छगन कमळ बघ, हे फडणीसांचे वाक्य खरे ठरणार आहे.

भुजबळ राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पुढे येत आहेत. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज आहे, असेही सांगितले जात आहे. तसेच त्यांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारीही मिळाली नाही. त्यामुळेही त्यांच्या नाराजीत भर पडली होती. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी व्यक्तही केली होती. 

छगन भुजबळ यांनी वर्षा या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!