मुंबईत जुहू समुद्रकिनाऱ्यावर रिल्स तयार करताना युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना, १४ तासांनंतर सापडला मृतदेह

Published : Aug 03, 2025, 04:46 PM IST
Techie drown

सार

काही जणांनी सांगितले, की विघ्नेश रिल्स तयार करत होता. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो पाण्यात बुडाला. परंतु, त्याचा मृतदेह सापडला नव्हता. शनिवारी रात्री त्याचा मृतदेह सापडला.

मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर बुडालेला २० वर्षीय युवक अखेर मृत अवस्थेत सापडला. शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी बुडाल्यानंतर तब्बल १४ तासांनंतर म्हणजे रात्री मृतदेह किनाऱ्यावर आढळला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

मृत युवकाची ओळख विघ्नेश मुरुगेश देवेन्द्रन (वय २०) अशी झाली आहे.

विघ्नेश शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता जुहूतील गोदरेज गेटजवळील सिल्व्हर बीचवर समुद्रात उतरला होता. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला आणि तो बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महापालिकेच्या म्हणण्यानुसार, विघ्नेश देवेन्द्रन आणि राजकुमार सुब्बा (वय २२) हे दोघे समुद्रात अंदाजे २०० मीटर अंतरावर असताना बुडू लागले. यावेळी बचावकर्त्यांनी तत्काळ कारवाई करत राजकुमार सुब्बाची सुटका केली. मात्र विघ्नेशचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. मुंबई अग्निशमन दलाने शोधमोहीम सुरू केली होती. मात्र भरतीमुळे दुपारी १.४५ वाजता शोधकार्य थांबवावे लागले.

शेवटी, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता स्थानिक मच्छीमार आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने विघ्नेशचा मृतदेह किनाऱ्यावर आढळून आला. त्याला तात्काळ जवळच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पावसाळ्यात अरबी समुद्र अनेकवेळा खवळलेला असतो आणि अशा काळात नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी किंवा मासेमारीसाठी जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाकडून सातत्याने दिला जातो.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Dhirubhai Ambani International School : जगात टॉप 10 मध्ये एकमेव भारतीय शाळा, मुंबईतील शाळेची फी किती?
Marco Rubio In India : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारतात; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट