
मुंबई : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मुंबईतील काही प्रमुख उपनगरांमध्ये आज आणि उद्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. काही भागांत पाणी पूर्णपणे बंद राहणार असून तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबई मेट्रो ७-अ प्रकल्पाअंतर्गत जलवाहिनीचे काम ‘के पूर्व’ विभागात हाती घेण्यात आले आहे. हे काम आजपासून गुरुवार, 22 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याच कारणामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
या विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
प्रभावित भाग
धारावी, जस्मिन मिल रोड, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, 60 व 90 फूट रोड, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर, ए. के. जी. नगर, धारावी मुख्य मार्ग, माहीम फाटक आदी परिसर.
या विभागात दोन्ही दिवस पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.
प्रभावित भाग
मुलगाव डोंगरी, एमआयडीसी, कोंडिविटा, मरोळ, जे. बी. नगर, चकाला, विमानतळ परिसर, बामणवाडा, पारसीवाडा, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अँड टी. कॉलनी.
काही ठिकाणी बुधवारी तर काही भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
या विभागात काही भागांत पाणी पूर्णपणे बंद, तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होणार आहे.
प्रभावित भाग
विक्रोळी–कांजूरमार्ग, भांडुप (पश्चिम), कोकण नगर, काजू टेकडी, टेंभीपाडा, शास्त्रीनगर, जयभीम नगर, पाधपोली गाव.
आरे मार्ग परिसरात दोन्ही दिवस सकाळपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणी मिळणार नाही.
एच पूर्व विभाग (BKC परिसर) – संपूर्ण भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
एन विभाग – विक्रोळी पश्चिम, गोदरेज कुंपण, कैलास संकुल, सागर नगर येथे ठरावीक वेळेत कमी दाबाने पाणी
पालिकेचे आवाहन
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा योग्य साठा करून ठेवण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.