झोपडीमुक्त मुंबई! १० लाख परवडणारी घरे आणि 'चौथी मुंबई'चा प्लॅन; फडणवीस सरकारचा महामुंबईसाठी ६० हजार कोटींचा बूस्टर डोस

Published : Mar 07, 2026, 08:30 PM IST
Maharashtra CM Devendra Fadnavis

सार

CM देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महामुंबईसाठी एक मोठा विकास आराखडा सादर केला आहे. या योजनेत झोपडपट्टी पुनर्विकासातून १० लाख घरे, उत्तन ते विरार सागरी सेतू आणि 'तिसरी' व 'चौथी मुंबई' यांसारख्या नवीन शहरांच्या निर्मितीचा समावेश आहे.

मुंबई: मुंबईकरांचे 'हक्काच्या घराचे' स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महामुंबईच्या कायापालटाचा महाभयंकर (Mega Plan) आराखडा सादर केला आहे. झोपडपट्टी पुनर्विकासापासून ते थेट समुद्रातून धावणाऱ्या सागरी सेतूंपर्यंत, मुंबई आता जागतिक दर्जाचे शहर बनण्याच्या दिशेने सज्ज झाली आहे.

१० लाख घरे आणि 'नो न्यू स्लम' पॉलिसी

मुंबईतील झोपडपट्ट्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

मोठा निर्णय: मुंबईतील सुमारे २० लाख झोपड्यांचा पुनर्विकास करून नागरिकांसाठी १० लाख परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जातील.

हायटेक पाळत: मुंबईत पुन्हा नवीन झोपड्या उभ्या राहू नयेत यासाठी GIS (Geographic Information System) आधारित मॅपिंगचा वापर केला जाईल. 'नो न्यू स्लम फ्रेमवर्क'मुळे शहराच्या नियोजित विकासाला गती मिळेल.

समुद्रातून प्रवास,  उत्तन ते विरार सागरी सेतू

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने ५८,७५४ कोटी रुपयांच्या उत्तन ते विरार सागरी सेतूची घोषणा केली आहे. हा मार्ग थेट मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाला जोडला जाईल.

अटल सेतू अपडेट: अटल सेतूला नवी मुंबई विमानतळाशी जोडणारा 'उलवे किनारी मार्ग' जुलै २०२६ पर्यंत पूर्ण होईल.

शिवडी-वरळी उन्नत मार्ग: सप्टेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग खुला करण्याचे लक्ष्य आहे.

तिसरी आणि 'चौथी मुंबई'चा जन्म!

मुंबईचा विस्तार आता केवळ उपनगरांपुरता मर्यादित नाही. सरकारने दोन नवीन शहरांची घोषणा केली आहे.

तिसरी मुंबई: अटल सेतूच्या (MTHL) परिसरात हे आधुनिक शहर वसले जाईल.

चौथी मुंबई: पालघरमधील वाढवण बंदर परिसरात नवीन औद्योगिक आणि निवासी केंद्र विकसित होईल.

उद्दिष्ट: २०३० पर्यंत महामुंबईची अर्थव्यवस्था १४० अब्ज डॉलरवरून ३०० अब्ज डॉलरवर नेणे.

मेट्रो आणि भुयारी मार्गांचे जाळे

मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारने तिजोरी खुली केली आहे.

मेट्रो-११ (वडाळा ते गेटवे): २३,४८७ कोटींचा भूमिगत प्रकल्प.

मेट्रो-८ (मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ): २२,८६२ कोटींची तरतूद.

भुयारी मार्ग: ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह दरम्यानचा हायटेक भुयारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होईल.

येत्या ५ वर्षांत मुंबईत राहणे, फिरणे आणि व्यवसाय करणे पूर्णपणे बदलणार आहे. मुंबई आता खऱ्या अर्थाने 'गेमचेंजर' मोडमध्ये आहे!

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मुंबईकरांचा प्रवास आता 'वॉटरवे'वर! लोकलची गर्दी आणि ट्रॅफिक जॅम विसरा; पाहा सरकारचा ६,६०० कोटींचा 'गेमचेंजर' प्लॅन
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! भर उन्हाळ्यात गोरेगावसह 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी