मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! भर उन्हाळ्यात गोरेगावसह 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी

Published : Mar 07, 2026, 05:57 PM IST
Water Cut in Mumbai

सार

गोरेगावमधील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे, १० मार्च रोजी मुंबईतील काही भागांत २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पी-पूर्व आणि पी-दक्षिण विभागातील अनेक परिसरांचा यात समावेश असून, नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई: मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून घामाच्या धारा सुटत आहेत. अशातच आता गोरेगाव आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महापालिकेकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने, आगामी मंगळवारी (१० मार्च) मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणी कपातीचे कारण काय?

गोरेगाव (पूर्व) येथील फिल्म सिटी मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी ७५० मिमी व्यासाची जलवाहिनी वळवण्यात आली आहे. या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे (Connection) काम मंगळवार, १० मार्च रोजी सकाळी ९ ते बुधवार, ११ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत चालणार आहे. या २४ तासांच्या कालावधीत खालील भागांत पाणी येणार नाही.

या भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे 'बंद' असेल

'पी-पूर्व' विभाग

शिवशाही प्रकल्प

श्रीकृष्ण नगर

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था परिसर

'पी-दक्षिण' विभाग

सॅटेलाईट टॉवर, संतोषनगर आणि माळीनगर

हबळे पाडा, उमरशेट पाडा आणि नगरमोडे पाडा

सुनील मैदान परिसर

फिल्म सिटी मार्गालगतचा संपूर्ण परिसर

येथे होईल 'कमी दाबाने' पुरवठा

१० मार्च रोजी दुरुस्तीच्या कामामुळे खालील परिसरात पाण्याचा दाब कमी असेल

मोहन गोखले मार्ग आणि कृष्णा वाटिका मार्ग

साई मार्ग आणि आर्य भास्कर मार्ग

महापालिकेचे आवाहन

उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे ज्या दिवशी पाणीपुरवठा बंद असेल, त्याआधीच नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. तसेच, पाणी जपून वापरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्मार्ट टिप: १० मार्चला काम असल्याने ९ मार्चलाच पिण्याच्या पाण्याचा जादा साठा करून ठेवा, जेणेकरून कामाच्या दिवशी धावपळ होणार नाही.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

मुंबई महानगरपालिकेचा कारभार मेट्रो वुमनच्या हातात, आश्विनी भिडे यांची लवकरच आयुक्तपदी होणार निवड
Mumbai MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काचं घर हवंय? म्हाडाच्या २६४० घरांसाठी आजपासून अर्ज सुरू; नोंदणी करण्यापूर्वी 'या' कागदपत्रांची यादी तपासा!