मुंबईकरांची लाडकी 'वनराणी' पुन्हा धावणार! व्हिस्टाडोम कोच आणि बॅटरीवर चालणारी हायटेक ट्रेन

Published : Mar 14, 2026, 08:11 PM IST

Van Rani Toy Train Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वनराणी' टॉय ट्रेन २०२१ च्या चक्रीवादळानंतर आता नव्या रुपात परतली. ही आधुनिक बॅटरीवर चालणारी ट्रेन व्हिस्टाडोम डब्यांसह सुसज्ज असून पर्यटकांना २.७ किमीच्या निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव देणारय.

PREV
15
मुंबईकरांची लाडकी 'वनराणी' पुन्हा धावणार!

मुंबई: मुंबईकरांच्या बालपणीच्या आठवणींशी जोडलेली आणि बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं (Sanjay Gandhi National Park) मुख्य आकर्षण असलेली 'वनराणी' (Van Rani) अखेर दिमाखात परतली आहे! २०२१ मध्ये 'तौक्ते' चक्रीवादळामुळे विस्कळीत झालेली ही टॉय ट्रेन आता नव्या रुपात, नव्या तंत्रज्ञानासह पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.

25
काय आहे 'वनराणी'चा नवा लूक?

जुनी वनराणी आता कात टाकून आधुनिक झाली आहे. या नव्या ट्रेनची काही खास वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

व्हिस्टाडोम कोचेस (Vistadome Coaches): ट्रेनला आता पारदर्शक काचेची छतं आणि मोठ्या खिडक्या असलेले व्हिस्टाडोम डबे जोडण्यात आले आहेत. यामुळे जंगलातील निसर्गसौंदर्य आणि जैवविविधता पर्यटकांना जवळून अनुभवता येईल.

पर्यावरणपूरक तंत्रज्ञान: ही नवी ट्रेन पूर्णपणे बॅटरीवर (Battery-operated) चालणारी आहे. यामुळे नॅशनल पार्कमध्ये प्रदूषण होणार नाही आणि वन्यजीवांनाही त्रास होणार नाही.

आरामदायी प्रवास: या ट्रेनमध्ये ३ डबे असून एका वेळी ७० ते ८० प्रवासी निसर्गसफरीचा आनंद घेऊ शकतात. 

35
२.७ किमीचा थरारक प्रवास!

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. ही ट्रेन 'कृष्णगिरी उपवन' परिसरातील २.७ किमीच्या खास ट्रॅकवर धावणार आहे. दाट झाडी, पक्षांचा किलबिलाट आणि शुद्ध हवा यामुळे हा प्रवास पर्यकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. 

45
पर्यटकांसाठी महत्त्वाची माहिती

कुठे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP), बोरीवली (पूर्व), मुंबई.

ट्रेकचे अंतर: २.७ किलोमीटर.

कोणाला फायदा: विशेषतः लहान मुले आणि निसर्गप्रेमी पर्यकांसाठी हे मोठे आकर्षण ठरेल. 

55
आधुनिक तंत्रज्ञानामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार

मुंबईतील अनेक पिढ्यांनी 'वनराणी'ची सफर केली आहे. चक्रीवादळात ट्रॅक आणि इंजिनचे नुकसान झाल्याने ही सेवा बंद होती, मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories