बघा VIDEO : Mumbai Railway Accident : पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून पडून 4 जणांचा मृत्यू, वाचा मृत आणि जखमी प्रवाशांची नावे

Published : Jun 09, 2025, 10:34 AM ISTUpdated : Jun 09, 2025, 04:20 PM IST
mumbai local accident

सार

मुंबईत मध्य रेल्वेच्या दिवा-कोपर स्थानकादरम्यान, प्रवाशांनी गर्दीमुळे चालत्या पुष्पक एक्स्प्रेस गाडीतून खाली पडल्याने 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रेल्वे सुरक्षा यंत्रणांची चूक आहे.

मुंबई – भारताच्या आर्थिक राजधानीत एक गंभीर आणि मन हेलावणारी घटना आज पुन्हा एकदा समोर आली. मध्य रेल्वेच्या (Central Railway) दिवा ते कोपर स्थानकादरम्यान, प्रवाशांनी गर्दीमुळे चालत्या पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express) गाडीतून खाली पडल्याने 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबईच्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये होणारी गर्दी ही नवीन गोष्ट नाही. दररोज लाखो प्रवासी अपुऱ्या डब्यांमध्ये ठासून प्रवास करतात. या घटनेतही, प्रवासी दारात लटकत होते, कारण आत जागा नव्हती. आणि नेमकं याच गर्दीच्या तणावात त्यांनी आपले प्राण गमावले. प्रशासनाने अद्याप यावर स्पष्टता दिली नसली, तरी काही व्हिडीओंमध्ये मृत आणि जखमी प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उचलतानाचे दृश्य समोर आले आहेत.

ही घटना फक्त रेल्वे सुरक्षा यंत्रणांची चूक नसून, ती प्रवासी व्यवस्थापन, लोकसंख्या वाढ, आणि उपयोजित सुविधांच्या कमतरतेची एक शोकांतिका आहे. रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने त्वरित माहिती दिली नाही ज्यामुळे परिस्थितीबाबत गोंधळ अधिकच वाढला होता.

हेही वाचा - अखेर उलगडा झाला, हनिमुनला गेल्यावर सोनमनेच केला राजाचा खून, पोलिसांनी तिला घातल्या बेड्या

रेल्वे अधिकारी स्वप्नील निल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात कसारा मार्गावर घडला असून, नेमकी गाडी कोणती याबाबत अजून स्पष्टता नाही. मृत प्रवासी ३०-३५ वयोगटातील होते, हे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासन, प्रवासी कल्याण योजना आणि सुरक्षा धोरणांकडे लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, की

"ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. प्रशासनाने अपघातामागील नेमकं कारण शोधायला हवं. प्रवाशांना कोणी धक्का दिला का? गर्दीमुळे ही घटना घडली असावी असं दिसतंय. त्यामुळे पूर्ण तपास करून दोषी ठरवलेच पाहिजे."

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे म्हणाले, की

"मुंबई ते कल्याण मार्गावरील लोकल पुरेशा नाहीत. प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत. ही व्यवस्था सुधारण्याची गरज आता टळलेली नाही."

माजी आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केले संताप

"या अपघातासाठी संपूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. दुर्घटनेच्या वेळी स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते आणि प्रवासी दरवाजांवर लटकून प्रवास करतात. ही व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे."

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, की

"ठाणे ते डोंबिवली परिसरातील लोकसंख्या वेगाने वाढत आहे, पण वाहतूक व्यवस्था त्या गतीने विकसित होऊ शकली नाही. त्यामुळे मेट्रो प्रकल्प, बायपास रेल्वे कनेक्शन आणि 15 डब्यांची लोकल सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी काही वर्ष लागतील, तोपर्यंत प्रवाशांनी शिस्त पाळावी, ही विनंती."

हेही वाचा - आज सोमवारी सकाळी नाश्ट्यात काय बनवणार? रव्यापासून तयार करा 5 ब्रेकफास्ट, 10 मिनिटांत होईल तयार

जखमी व्यक्तींची माहिती-

1. श्री. शिवा गवळी (पुरुष, २३ वर्ष)

2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा.)

3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी.)

4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष.)

5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे.)

6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा.)

7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद.)

8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा.)

9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण.)

मृत व्यक्तींची माहिती-

1. केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)

2. राहुल संतोष गुप्ता

3. विकी बाबासाहेब मुख्यदल (पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)

4. अज्ञात व्यक्ती

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा