Mumbai Pune traffic | मुंबई - पुणे रेल्वे-रस्ते बंद, मुंबईत इमारत कोसळून 6 ठार

Published : Jul 06, 2026, 08:36 AM IST
mumbai pune rail traffic board

सार

मुंबई -पुणे रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूंनी अनिश्चित वेळेसाठी बंद करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात खोळंबली आहे. पुणे-मुंबई रस्ते वाहतूक देखील बंद आहे. मुंबई - पुणे महामार्ग देखील बंद आहे. पुणे जिल्ह्यासह मुंबई आणि उपनगरात शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईत येणारी रस्ते आणि रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे. मुंबई - पुणे रेल्वे मार्ग पूर्ण बंद झाले आहेत. मुंबई सेन्ट्रल रेल्वेची पुण्याच्या दिशेची - लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-नाशिक रेल्वे सेवा मात्र सध्या तरी सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. नालासोपारा रेल्वे स्टेशनर रेल्वे रुळाच्या वर पाणी आले आहे. मुंबई - पुणे दरम्यानच्या लांब पल्ल्याच्या 16 गाड्या रद्द झाल्या आहेत. 9 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत, तसेच वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग सुरळीत होईपर्यंत बंद असणार आहे. 

मुंबई -पुणे रस्ते वाहतूक देखील ठप्प आहे. एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकच्या बाजूला दरड कोसळल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वे बंद आहे. मुंबई-पुणे जुना महामार्ग देखील सध्या बंद आहे. सेन्ट्रल रेल्वेच्या ट्रॅकवर मंकी हिलजवळ दरडीचा भाग कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे.मुंबईत कालरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे.

मानखुर्दमध्ये इमारत कोसळून 6 ठार

मुंबईत हार्बर रेल्वेची रेल्वे वाहतूक देखील धीम्या गतीने सुरु आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद झाली आहे. मुंबईत मानखुर्दमध्ये इमारत कोसळल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात सहा लहान मुलांचा देखील समावेश आहे.मुंबईत रात्रीही मुसळधार पाऊस झाला, त्या सोबत सोसाट्याचा वारा देखील सुरुच आहे.

मुंबईत आतापर्यंत 142 झाडं कोसळली, 3 मृत्यू

मुंबईत कालपासून झाडं पडण्याच्या घटना सुरुच आहेत. मुंबईत झाड पडून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 142 झाडं कोसळली आहेत.झाडांच्या फांद्या छाटल्यानंतर, झाडांची उंची वाढली, तसेच मुळांना पसरण्यासाठी सिमेंटचे रस्ते आणि फुटपाथमुळे जागा नसल्याने ही स्थिती झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. एकंदरीत मागील 3 दिवसापासून मुंबईत जो पाऊस झाला आहे, त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीची आणि मुंबईकरांची दैना झाली आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सावधानतेने अपघात टळला

सेन्ट्र्ल रेल्वेवर दरळ कोसळण्याच्या घटना घडल्या, पण रेल्वे कर्मचारी सावध असल्याने कोणताही अपघात झालेला नाही. हे रेल्वे कर्मचाऱ्यांचे यश आहे. मुंबईत 40 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारा सुरु आहे. झाडं कोसळणे किंवा इतर घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडणे धोक्याचे असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. 

अडकलेल्या प्रवाशांसाठी खाण्याचे पदार्थ पोहोचवण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहेत.मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व विषयांचे पेपर रद्द झाले आहेत, लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे जिल्हा आणि मुंबईत आज शाळांना मुसळधार पावसामुळे सुटी जाहीर करण्यात आली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

राम मंदिर चोरीचा तपास लागेपर्यंत शांत बसणार नाही, उद्धव ठाकरेंनी केली घोषणा
मुंबईत दहा ठिकाणी झाड कोसळली, आरे आणि कुर्ला येथे झाड अंगावर पडून दोघांचा झाला मृत्यू