मुंबईत गणेश विसर्जनासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, काय आहेत नवे नियम?

मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, ७ ते १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत अवजड वाहनांवर निर्बंध आणि पार्किंग नियम लागू असतील. धोकादायक पुलांवर मिरवणुकीसाठी देखील विशेष नियम आहेत.

मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साहात आणि जल्लोषात गणपती बाप्पा साकारणे आणि विसर्जन हे मोठ्या थाटात होते. विसर्जन मिरवणुकीसाठी मुंबईत देशभरातून भाविक येतात आणि शहरातील विविध मार्गांवर गर्दी व वर्दळ वाढते. यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केले जातात. यावर्षी, ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुंबई पोलिसांनी वाहतूक नियम आणि निर्बंध जाहीर केले आहेत.

1. अवजड वाहनांसाठी निर्बंध

गणेशोत्सवाच्या काळात, दक्षिण मुंबईतील काही रस्त्यांवर वाहतूक बंदी: ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान, सकाळी ११:०० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांवर निर्बंध असतील.

आवश्यक सेवा वाहने

 भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पिण्याचे पाणी, पेट्रोलियम उत्पादने, रुग्णवाहिका, सरकारी आणि निम-शासकीय वाहने, आणि स्कूल बसेस यांना सूट देण्यात आलेली आहे.

2. पार्किंगसाठी नियम

'ऑन-स्ट्रीट पार्किंग'वर प्रतिबंध: सर्व अवजड वाहने आणि खासगी बसेस यांना केवळ त्यांच्या मालकीच्या जागी, भाड्याने घेतलेल्या जागी किंवा अधिकृत 'पे अँड पार्क' जागेवर पार्क करण्याची परवानगी आहे. सार्वजनिक रस्त्यांवर पार्किंग पूर्णपणे बंद आहे.

3. धोकादायक पुलांवर मिरवणूक नियम

१०० व्यक्तींची मर्यादा: धोकादायक पुलांवर गणेश विसर्जन मिरवणूक वेळी १०० पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहू नयेत.

थांबण्याची मनाई: मिरवणूक धोकादायक पुलांवर थांबू नये.

ध्वनीक्षेपक आणि नृत्याची मनाई: पुलावर ध्वनीक्षेपकाचा वापर आणि नृत्य करणे पूर्णपणे बंद आहे.

4. धोकादायक पुलांची यादी

मध्य रेल्वेवरील पुल

घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज

करीरोड रेल ओव्हर ब्रिज

आर्थररोड रेल ओव्हर ब्रिज / चिंचपोकळी रेल ओव्हर ब्रिज

भायखळा रेल ओव्हर ब्रिज

मरिन लाइन्स रेल ओव्हर ब्रिज

पश्चिम रेल्वेवरील पुल

सॅडहर्स्ट रोड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

फ्रेंच रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

केनडी रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये)

फॉकलंड रेल ओव्हर ब्रिज (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये)

बेलासीस, मुंबई सेंट्रल स्टेशनच्या जवळ

महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज

प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रिज

दादर टिळक रेल ओव्हर ब्रिज

गणेश विसर्जनाच्या काळात शहरात वाहतूक व्यवस्थेला सुरळीत ठेवण्यासाठी, तसेच भाविकांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. कृपया या सूचनांचे पालन करून गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षितपणे घ्या.

आणखी वाचा :

Read more Articles on
Share this article