Mumbai Monsoon Update : मुंबईत आजपासून पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याकडून यलो अ‍ॅलर्ट जारी

Published : Jun 23, 2026, 08:02 AM ISTUpdated : Jun 23, 2026, 08:05 AM IST
Mumbai Monsoon Update

सार

Mumbai Monsoon Update : हवामान खात्याने मुंबईत आजपासून पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यासोबत यलो अ‍ॅलर्ट देखील जारी केला आहे. जाणून घेऊया मुंबईत पावसाची स्थिती एकूणच कशी असणार याबद्दल सविस्तर...

Mumbai Monsoon Update : जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मॉन्सूनची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या तीन आठवड्यांची वाट पाहायला लावल्यानंतर मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून (23 जून) मॉन्सून सक्रीय होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याशिवाय शहरात यलो अ‍ॅलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात नैऋत मोसमी वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता असल्याचे IMD ने म्हटले आहे.

मुंबईसाठी 24 जूनपर्यंत यलो अ‍ॅलर्ट

मुंबई आणि परिसरात 24 जूनपर्यंत यलो अलर्ट कायम राहणार आहे. आठवड्याच्या अखेरीस झालेल्या हलक्या पावसानंतर आता पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रासह तेलंगणा, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमधील काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

 

आजपासून मॉन्सूचा वेग वाढणार

स्कायमेटच्या (Skymet) अंदाजानुसार, यंदा मुंबईत मॉन्सूचने आगमन उशिराने झाले. पण आता पावसासाठी सकारात्मक हवामान तयार होत आहे. यामुळे आजपासून मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाढलेला दिसणार आहे.

 

 

हलका ते मध्यम पावसाची शक्यता

हवामान खात्यानुसार, सुरुवातीला हलका ते मध्यम स्वरुपात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. यानंतर पुढील काही दिवसांत मॉन्सूनसाठी पोषक असे वातावरण तयार झाल्यानंतर पावसाचा जोर वाढलेला दिसून येईल.

कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता वाढणार

23 जूननंतर कोकण पट्टा, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता उकाड्याने हैराण झालेल्या मॉन्सूनच्या आगमनाने मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Metro Viral Video: आंघोळ करून थेट मेट्रोमध्ये! बाथरोब आणि टॉवेल गुंडाळून तरुणीचा प्रवास, प्रवासीही अवाक्
Viral Video : मुंबईत ८ महिने राहिल्यानंतर जपानी तरुणीने सांगितला अनुभव, व्हिडिओ व्हायरल