Mumbai MHADA : हक्काच्या घरासाठी अंतिम संधी! म्हाडा मास्टर लिस्टसाठी अर्जांना मुदतवाढ; पात्र रहिवाशांनी तात्काळ करा नोंदणी

Published : Jan 28, 2026, 04:07 PM IST

MHADA Master List Application : म्हाडाने संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरू,  त्यांच्या वारसांसाठी मास्टर लिस्ट अंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली. ही ऑनलाइन प्रक्रिया पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळवून देण्याची संधी आहे.

PREV
15
हक्काच्या घरासाठी अंतिम संधी! म्हाडा मास्टर लिस्टसाठी अर्जांना मुदतवाढ

मुंबई : संक्रमण शिबिरात वास्तव्यास असलेल्या मूळ भाडेकरू, रहिवासी तसेच त्यांच्या वारसांसाठी म्हाडाकडून (MHADA) दिलासादायक बातमी समोर आली आहे. या पात्र रहिवाशांची छाननी करून त्यांना कायमस्वरूपी घर मिळावे, यासाठी म्हाडाने मास्टर लिस्टअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक व पात्र नागरिकांना 15 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 

25
कोणासाठी आहे ही अर्ज प्रक्रिया?

म्हाडाच्या बृहतसूचीत (Master List) समाविष्ट असलेल्या आणि सध्या संक्रमण शिबिरात राहणाऱ्या मूळ भाडेकरू किंवा त्यांच्या वारसांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. काही उपकरप्राप्त इमारती पाडण्यात आल्याने त्या पुन्हा बांधता येऊ शकल्या नाहीत. तर काही ठिकाणी पुनर्बांधणी झाली असली, तरी अपुऱ्या सदनिकांमुळे सर्व पात्रांना घर मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत, ज्यांना आजवर कायमस्वरूपी घर मिळालेले नाही आणि जे अद्याप संक्रमण शिबिरात राहत आहेत, अशा रहिवाशांसाठी ही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. 

35
अर्ज कधीपासून आणि शेवटची तारीख कोणती?

मिळालेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे

15 फेब्रुवारी रात्री 11.59 वाजेपर्यंत नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे

या मुदतीनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे पात्र रहिवाशांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. 

45
अर्ज कसा आणि कुठे करायचा?

अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. www.mhada.gov.in या वेबसाइटवरील Citizen Corner मध्ये जाऊन Application for Master List या पर्यायावर क्लिक करावे. तसेच masterlist.mhada.gov.in या स्वतंत्र पोर्टलवरूनही थेट नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेद्वारे अर्जदारांची पात्रता तपासली जाणार असून, त्यानंतर पात्र रहिवाशांना सदनिका वाटप करून त्यांच्या घराच्या हक्काची खात्री केली जाणार आहे. 

55
घर मिळवण्याची सुवर्णसंधी

ही संपूर्ण प्रक्रिया सोप्या आणि पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या पात्र रहिवाशांसाठी ही हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची अंतिम व महत्त्वाची संधी मानली जात आहे. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories